पुन्हा कोकण रेल्वे स्थानकावर गोवा एक्सप्रेसमधून लाखांचा गुटखा जप्‍त

मडगाव रेल्‍वे स्‍थानकांवर चार दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Madgaon Railway 
Station
Madgaon Railway StationDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगाव (Margao) कोकण रेल्वे (Konkan Railway) स्थानकावर राजधानी एक्सप्रेसमधून (Rajdhani Express) तस्करी करण्यात आलेला 23 लाख रुपयांचा गुटखा जप्त केल्याची घटना ताजी असतानाच काल मंगळवारी पुन्हा कोकण रेल्वे स्थानकावर गोवा एक्सप्रेस (Goa Express) रेल्वेतून आलेला 14 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.

मडगाव रेल्वे स्थानकावर शुक्रवारी राजधानी एक्सप्रेसमधून लोकांबरोबर मोठ्या प्रमाणात पार्सल्‍सही आले होते. ही पार्सल्‍स स्थानकावरील पार्सल रुममध्ये ठेवण्यात आल्यावर पोलिसांनी तपास करून हा लाखोंचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी 23 लाख रुपयांच्या 56 गुटख्याच्या बॅगा जप्त केल्या होत्या. ही घटना होऊन चार दिवसही उलटले नसताना, आज पुन्हा 14 लाख रुपयांचा 15 गुटख्याच्या बॅगा जप्त करण्यात आल्‍या. हा गुटखा गोवा एक्सप्रेस रेल्वेतून पबन गुप्ता यांच्या नावावर आला असून या तस्करीत गुंतलेल्या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत.

Madgaon Railway 
Station
गोव्यात संतापाची लाट: शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मडगाव पोलिसांनी चार दिवसांत केलेली ही दुसरी कारवाई आहे. पोलिसांनी या दोन कारवाईत 37 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या गुटखा तस्करीत अन्य काहींचाही समावेश असण्याची शक्यता असून पोलिस त्या अनुषंगाने तापस करीत आहे.

एंजट ताब्‍यात; अनेक ‘मासे’ अडकणार?

मडगाव कोकण रेल्वे स्थानकावरील पार्सल रुममध्ये मोठ्या प्रमाणात गुटखासाठा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपास करून लाखोंचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुटख्याने भरलेल्या 56 बॅगा जप्त केल्या असून या गुटख्याची किंमत 23 लाख रुपये आहे.

Madgaon Railway 
Station
Goa Night Club...तर पुण्यातील त्या दोघांचा अपघात टळला असता!

बॅग जप्त केल्यावर हा गुटखा नेण्यासाठी आलेल्या हरकेश बैरवा या एजंटला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या एजंटकडून मिळालेल्या माहितीवरून गोव्यात गुटखा वितरण करणारा राहुल मत्कार (फोंडा) याचे नाव समोर आल्याने त्याने अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या हरकेश बैरवा याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com