Youth Festival: राष्ट्रीय युवा महोत्सवात गोव्यातील 10 हजार युवकांचा सहभाग

25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गोव्यातून गुणाजी मांद्रेकरला संधी मिळाल्यामुळे, हा आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असल्याचे मत त्याने व्यक्त केले.
National Youth Festival:
National Youth Festival:Dainik Gomantak

National Youth Festival: भारतात स्वामी विवेकानंदांच्या जयंती स्मरणार्थ दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. विवेकानंदांच्या (Swami Vivekanand) विचारांचे आचरण आजच्या युवा पिढीने करावे यासाठी ह्या दिवसाला खूप महत्व आहे. आजवर गोव्यातील असेच अनेक तरुण आहेत ज्यांनी आपल्या राज्याचे नाव उंचावले आहे. अश्याच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गोव्यातील गुणाजी मांद्रेकरने देखील गोव्याच्या आणि देशातील सर्व तरुणांना प्रेरित केले आहे.

National Youth Festival:
शरद पवारांनी यापूर्वीही हातात हात घेत आघाड्या केल्या होत्या...

गुणाजी मांद्रेकर याला भारतातील उत्कृष्ट सामाजिक सेवांसाठी राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर देशात होणाऱ्या '25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव' या युवांसाठीच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांत गुणाजीला केंद्र सरकारतर्फे (Central Government) उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आज राष्ट्रीय युवा महोत्सवाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात गुणाजीला गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

यासंबंधी गुणाजीने 'गोमन्तक'शी संवाद साधला. तो म्हणाला की, 'राष्ट्रीय पुरस्कार मिळवणे ही माझ्या आयुष्यातील खूप मोठी आहेच, पण केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सामील होण्यासाठी आणि आपले राज्य म्हणजे गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले, यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. हा महोत्सव पुद्दुचेरी येथे 12 ते 16 जानेवारी 2022 या दरम्यान होणार होता, पण वाढत्या कोरोना संकटामुळे (Corona Crisis) हा कार्यक्रम रद्द करुन व्हर्चुअल पद्धतीने घेण्याचे सरकारतर्फे ठरवण्यात आले. त्यामुळे मी देखील आज व्हर्चुअलीच या महोत्सवात सहभाग घेतला.'

National Youth Festival:
16 जानेवारीला दिल्लीत होणार भाजपच्या उमेदवारांची निवड

तो पुढे म्हणाला, 'देशातील तरुणांना प्रेरित करण्यासाठी आणि विवेकानंदांच्या विचारातील युवक घडवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे दरवर्षी या युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. युवांसंदर्भात मी राबवलेले उपक्रम, माझी वाटचाल आणि एकंदरीत काम पाहून सरकारतर्फे मला आमंत्रण येणे ही माझ्या आजवरच्या कामाची पोचपावतीच आहे, असे मला वाटते. महोत्सव जर पुद्दुचेरीमध्ये झाला असता, तर त्याला फक्त 7000 युवकच उपस्थित राहू शकले असते, पण हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीमध्ये झाल्यामुळे याला 10 लाखाहून अधिक युवक उपस्थित राहू शकले. यात गोव्यातील 10 हजारहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला होता.'

'पुढील 7 दिवस हा महोत्सव चालणार असून दरदिवशी युवकांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील प्रत्येक नेहरू युवा केंद्रातील तरुणांनी घरी बसून या कार्यक्रमाला हजेरी लावली. यात लोकनृत्य, संगीत, वक्तृत्व अशा अनेक विषयांचे सांघिक/वैयक्तिक सादरीकरण होणार आहे.' गुणाजी मांद्रेकरला मिळालेला हा सन्मान आपल्या गोव्याचा सन्मान आहे. त्यामुळे गोव्यातील तरुणांना या महोत्सवामुळे नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com