शरद पवारांनी यापूर्वीही हातात हात घेत आघाड्या केल्या होत्या...

गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीसांच्या आघाडीच्या चर्चेवरुन कानपिचक्या
Devendra Fadnavis on Goa Election
Devendra Fadnavis on Goa ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि गोव्याचे काँग्रेस प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. भाजपला गोव्यात कोणतंही नुकसान होणार नाही. (Devendra Fadnavis News Updates)

Devendra Fadnavis on Goa Election
काँग्रेसकडून गोवा फॉरवर्डला आणखी जागा मिळणार?

भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी लोकसभा निवडणुकीतही शरद परावांनी विरोधकांच्या महाआघाडीचा प्रयत्न केला होता. शरद पवार म्हणाले तसे हातात हात घेऊन आघाड्या झाल्या. मात्र त्यात त्यांना अपयश आले होते. गोव्यात त्यांनी विरोधी पक्षांची आघाडी केली तरी त्याचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

Devendra Fadnavis on Goa Election
'फोंडा गोव्यातील तिसरा जिल्हा होणार'

दुसरीकडे उत्पल पर्रीकरांच्या उमेदवारीवरही फडणवीसांनी परखड भाष्य केलं आहे. मनोहर पर्रीकरांनी (Manohar Parrikar) गोव्यात भरपूर काम केलेलं आहे. मात्र केवळ त्यांचा मुलगा म्हणून तिकीट देता येणार नाही. त्याचा निर्णय़ भाजपची केंद्रीय कमिटी घेईल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis on Goa Election
रिव्हॉल्युशनरी गोवन्सवर विश्वासघात केल्याचा आरोप..

मायकल लोबो (Michael Lobo) यांनी भाजप सोडल्यामुळे काहीही फरक पडणार नाही. त्यांनी भाजपचा जेवढा फायदा घ्यायचा तेवढा घेतलाय. आता लोबोंना त्यांच्यासोबत पत्नीचंही तिकीट हवं आहे. काँग्रेस ते देतंय, त्यामुळे लोबोंच्या जाण्याने नुकसान न झाल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com