सासष्टी : शनिवार 16 जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सांसदीय समितीच्या बैठकीत, गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार निश्र्चित केले जातील. त्यादिवशी संध्याकाळपर्यंत नावे जाहीर केली जातील. आपण त्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आज मडगावी पत्रकारांना सांगितले.
गोव्यातील (goa) कुठल्याही मंतदारसंघात उमेदवार जाहीर झालेले नाही. आजपासून उमेदवार निवडीसाठी बैठका सुरु झाल्या आहेत. प्रत्येक मतदार संघात एक दोन उमेदवार आहेत. पक्षाच्या सांसदीय समितीच्या बैठकीत उमेदवार निश्र्चित केले जातील असे मुख्यमंत्री (CM) पुढे म्हणाले.
गुण घोटाळ्याची आपल्याला कल्पना नाही
ज्या कोणी गुण घोटाळा झाल्याचे जाहीर केले आहे व त्यात आपला हात आहे, असा आरोप केला आहे तो वैफलग्रस्त झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्याची आपल्याला कींव येते. एमबीबीएसच्या पॅथोलॉजी विषयात आपल्या पुतण्याला जास्त गुण द्यावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी डीनवर दबाव टाकला असा आमदार विजय सरदेसाई यांनी आरोप केला होता.
या संबंधी विचारलेल्या प्रश्र्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हा आरोप धांदात खोटा आहे. आपल्याला याची काहीच कल्पना नाही. आपण डीनला या प्रकरणी जाहीर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुलांच्या शिक्षणाकडे मी कधीही हस्तक्षेप करणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.