प्रत्येक तालुक्यासाठी 'एक हजार नोकऱ्यांची' गरज! लवकरच मुख्यमंत्र्यांशी बोलणार; आरोग्यमंत्री राणे

Vishwajit Rane: मंत्री राणे म्हणाले की सत्तरीत विकास कशाप्रकारे होऊ शकतो याचा विचार केला जात आहे; समाजातील प्रत्येक घटकाला चांगल्या सुखसोयी देण्याचा आमचा प्रयत्न
Vishwajit Rane: मंत्री राणे म्हणाले की सत्तरीत विकास कशाप्रकारे होऊ शकतो याचा विचार केला जात आहे; समाजातील प्रत्येक घटकाला चांगल्या सुखसोयी देण्याचा आमचा प्रयत्न
Goa BJP |Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: गोव्यात तब्बल २२ हजार नोकऱ्यांची संधी युवकांना देण्याची गरज आहे. प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक एक हजार नोकऱ्या दिल्या पाहिजेत. असे केले तरच सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळू शकेल. यासाठी मी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

यावेळी मंत्री राणे म्हणाले की, नोकऱ्या निर्माण करणे शक्य झाले नाही तर मला वेगळा विचार करावा लागेल. कारण नोकऱ्यांचे आश्वासन आम्ही निवडणुकीवेळी दिले आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांमध्ये नोकऱ्यांची संधी अजिबात मिळालेली नाही.

त्यामुळे प्रत्येक पालक व सुशिक्षित बेरोजगार मला नोकरी कधी मिळणार, यासंदर्भात विचारणा करू लागला आहे. त्यामुळे कुचंबणा होऊ लागली आहे. येणाऱ्या अडीच वर्षांमध्ये सरकारला नोकऱ्या निर्माण करणे शक्य झाले नाही, तर बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी वेगळा विचार करावा लागेल. वाळपई पालिका सभागृहातील भाजप सदस्यता नोंदणी मोहिमेंतर्गत महिला मेळाव्यात ते बोलत होते.

मी पूर्वीही सांगितले आहे, सरकार जर रोजगार देऊ शकत नाही, तर अशा सरकारची आम्हाला गरज नाही. नोकऱ्या देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने नोकऱ्या तयार केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. व्यासपीठावर वाळपईच्या नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, विनोद शिंदे, उपनगराध्यक्ष फैजल शेख, नगरसेवक अनिल काटकर, शहाफत खान आणि मान्यवर उपस्थित होते.

नर्सिंग काॅलेजचे ३ रोजी भूमिपूजन

वाळपई उद्यानाचे काम लवकरच काम पूर्ण होईल. नाणूस मैदानाचे काम सुरू आहे, पर्ये मतदारसंघातील प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. त्यात भूमिका मैदानाचा विकास केला जाणार आहे. पर्ये येथे १८ कोटी रुपये खर्चून भूमिका नर्सिंग काॅलेज उभारले जाणार असून ३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाच्या मुहुर्तावर त्याचे भूमिपूजन केले जाईल, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

४० हजार सदस्य बनविणार

यापूर्वी आम्ही निवडणुकीवेळी सत्तरीतून ३० हजार मतांची आघाडी मिळणार, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार ते घडले. त्याचप्रमाणे आगामी काळात पक्ष बळकट करण्यासाठी भाजपचे ४० हजार सदस्य बनवून दाखविणार, असे राणे यावेळी म्हणाले.

Vishwajit Rane: मंत्री राणे म्हणाले की सत्तरीत विकास कशाप्रकारे होऊ शकतो याचा विचार केला जात आहे; समाजातील प्रत्येक घटकाला चांगल्या सुखसोयी देण्याचा आमचा प्रयत्न
Goa BJP: अशा खोडसाळ व्हिडिओंचा उपयोग होणार नाही! सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांसोबतच; शिरोडकर, खंवटेंचा दावा

आम्ही नोकरी दिली; पण पैसे घेतले नाहीत

मंत्री राणे म्हणाले की, आज समाजात रोजगाराची समस्या वाढत चालली आहे. प्रत्येकजण नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना त्यांच्या कार्यकाळात अनेकांना नोकरी दिली. त्यानंतर आम्हीही नोकरी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे करत असताना कोणाकडून पैसे घेतले नाहीत.

गरजूंना मदतीचा हात

मंत्री राणे म्हणाले की, सत्तरीत रस्ते, वीज, पाणी, पूल, आदींचा विकास कशाप्रकारे होऊ शकतो, याचा विचार केला जात आहे. समाजातील प्रत्येक घटकाला चांगल्या सुखसोयी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. सत्तरीतील ग्रामीण भागातील जनता गरीब आहे. त्यांचा विचार पहिल्यांदा करायला हवा. अनेकांची घरे नाहीत. त्यांना गरजेनुसार घरे बांधून दिली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com