Ramesh Tawadkar: तीन वर्षांत निराधारांना 100 घरे बांधून देणार; सभापती रमेश तवडकर यांचे आश्‍वासन

‘श्रम-धाम’ अंतर्गत विविध ठिकाणी ५ घरांचे बांधकाम सुरू
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak

Ramesh Tawadkar: मी सामान्य माणूस असून विधानसभा निवडणुकीवेळच्या अनेक घटना कायम स्मरणात राहिल्या. समाजातील शेवटच्या माणसाचे दु:ख मी जाणतो. सर्वप्रकारचे दु:ख मी भोगले आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर ‘श्रम धाम’ योजना प्रत्यक्षात येत आहे.

100 घरे पुढील टप्प्यात बांधण्यात येणार आहेत. सरकार सगळेच प्रश्न सोडवू शकत नाही. पुढील ३ वर्षात सर्व निराधारांना हक्काचे छप्पर देणार आहे, असे आश्‍वासन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

श्रम-धाम योजने अंतर्गत बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने निराधारांना घरे बांधून देण्याच्या कार्यक्रमांतर्गत आज दि.19 रोजी ओंवरे, पाळोळे येथे बांधकाम स्थळी ते पत्रकारांशी बोलत होते.

Ramesh Tawadkar
CM Pramod Sawant : म्हणून शिगमाही मूळ जागी पोहोचला : मुख्यमंत्री

यावेळी नगराध्यक्ष रमाकांत नाईक गांवकर, खानापूर(कर्नाटक) येथील नगरसेविका धनश्री सरदेसाई जांबोटीकर, नगरसेवक सायमन रिबेलो, मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, उपाध्यक्ष शांबा देसाई, सरचिटणीस दिवाकर पागी, विलियम फर्नांडिस व अन्य अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पाळोळें, ओंवरे येथील इरोबियल फर्नांडिस यांच्या भिंती नसलेल्या घराजवळच्या साफ सफाईचे काम यावेळी कार्यकर्त्यांनी केले.अन्य स्थानिक नागरिकही या उपक्रमात सहभागी झाले. सुरुवातीला सायमन रिबेलो यांनी सभापती व अन्य नागरिक याचे उत्स्फूर्त स्वागत केले.

धनश्री करणसिंह सरदेसाई म्हणाल्या की, आपण हे सर्व काम प्रत्यक्षात पाहून एकदम भारावून गेले आहे. आमदार तवडकर यांनी अतिशय अनोखी संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा विडा उचललेला आहे. या कामी मी त्यांना 50 हजार रुपयांचा धनादेश देत असून यापुढे कधीही हाक दिल्यास मी सदैव तत्पर राहिन. 8 नागरिकांनीही या कामाकरता आपल्याकडे आर्थिक मदत सुपूर्द केली आहे, असे सभापती तवडकर यांनी सांगितले.

झिलतावाडी येथील श्रीमती पमू मिराशी, कुंभेगाळ येथील कुशावती कुष्ठ भगत, दाबेल येथील नागे थको वरक, अर्धफोंड येथील हरिश्चंद्र राम नाईकआणि पाळोळे येथील युरोबियल फर्नांडिस या एकूण 5 घराच्या बांधकामाचा आज शुभारंभ करण्यात आला.

Ramesh Tawadkar
हिंदू धर्म समर्थ, विधवा प्रथेबाबतच्या खासगी ठरावावर बजरंग दलाचे फळदेसाई यांची टीका

इतरांनीही आदर्श घ्यावा !

राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये अनेक निराधारांना हक्काच्या घरांची,आसऱ्याची गरज आहे. सरकारची योजना लोकांपर्यंत पोहचेलच. पण त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे लोकसहभागातून श्रमधाम सारख्या योजनांतून लोकांना हक्काचे छप्पर मिळाल्यास त्याहून आनंद असणार नाही, अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांतून व्यक्त होत होत्या.

सभापती रमेश तवडकर यांनी निराधारांसाठी छप्पर देण्याचा संकल्प पूर्णत्वास जावो,अशी सदिच्छा व्यक्त करून इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा,असे खानापूरच्या नगरसेविका धनश्री सरदेसाई यांनी सांगितले.

"निवडणुकीवेळी अंत्योदय तत्वावर आधारित समाजातील घटकांना घर बांधून देण्यात येईल, असे दिलेले आश्वासन पाळणारे रमेश तवडकर पहिले आमदार ठरले आहेत. राज्यातील अन्य आमदारांवर सध्या घरे उपलब्ध करून देण्याचा प्रचंड दबाव असल्याचे दिसते, ही वस्तुस्थिती आहे. पालिका क्षेत्रात सध्या 6 घरे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. श्रमधाम ही आदर्श संकल्पना असून आपला या कामी सदैव पाठिंबा आमदार तवडकर यांना राहील."

- रमाकांत नाईक गावकर, नगराध्यक्ष काणकोण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com