Goa Garbage Issue: कचऱ्यावर दरवर्षी 100 कोटी अतिरिक्त खर्च

Goa Garbage Issue: मुख्यमंत्री सावंत : जनतेने खबरदारी घ्यावी, साखळीत स्वच्छता अभियानात सहभाग
Goa Garbage Issue
Goa Garbage IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Garbage Issue: राज्यात कचरा समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनासाठी सरकारीतिजोरीवर अधिक ताण पडत आहे. दरवर्षी अतिरिक्त १०० कोटी सरकारला कचरा विल्हेवाटीसाठी खर्च करावे लागतात. कचऱ्याबाबत प्रत्येकाने खबरदारी घेतली तर आपले गाव, शहर तसेच राज्य स्वच्छ सुंदर होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

Goa Garbage Issue
High Cholesterol: देशी तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते ? जाणून घ्या काय आहे सत्य

एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमाखाली साखळी पालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानाच्या उद्‍घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. झेंडा दाखवून त्यांनी या अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, ब्रह्मानंद देसाई, रियाझ खान, निकीता नाईक, दीपा जल्मी, अंजना कामत, विनंती पार्सेकर, प्रवीण ब्लेगन, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर आदी उपस्थित होते.

कचऱ्यापासून आज चांगली कमाईही होते. साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचऱ्यापासून वीज निर्मिती होत असून ती प्रकल्पात वापरण्यास मिळते. उर्वरित वीज खात्याला देत असल्याने त्यांची कमाई होत आहे. असाच प्रकल्प साखळीत राबवणे शक्य आहे, येथे जागाही उपलब्ध आहे. तसेच आवश्‍यक प्रमाणात कचराही उपलब्ध होऊ शकतो.

Goa Garbage Issue
Breastfeeding: आईचे या गंभीर आजारांपासून संरक्षण करते स्तनपान...

ओल्या सुक्या कचऱ्याबरोबरच ई कचराही सध्या डोकेदुखी ठरत आहे. असा कचरा वेगळा बांधून ठेवल्यास पालिकेची गाडी सदर ई कचरा उचलू शकते. तशी व्यवस्था करण्याची सूचना आपण नगरपालिकेला करणार आहे, असे मुख्यमंत्री पुढे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी हाऊसिंगबोर्ड, रवींद्र भवन परिसरात फिरून स्वच्छता अभियानात भाग घेतला. तसेच येथील दुकानदारांशी संवाद साधून कचऱ्याबाबत काळजी घ्या, अशी सूचना केली.

मुख्यमंत्री म्हणतात...

1 प्लास्टिक पिशव्यांत भरून कुठेही कचरा फेकण्याच्या प्रकारामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. तसेच गुरे व अन्य जनावरांसाठीही हा कचरा घातक ठरतो. प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण हे आपल्या घरापासून सुरू होते. घरातून बाजारात जाताना कपड्याच्या पिशव्या घेऊन जाणे बंधनकारक करावे.

2 विविध वाईन शॉपवर विक्री होणाऱ्या बियरचे केन व अन्य बाटल्या रिकामे झाल्यावर कोठेही फेकण्याचे प्रकार वाढले आहेत. विक्रेत्यांनी आपल्या दुकानांसमोर कचराकुंडीची सोय करावी.

3 घरातील सांडपाणी गटारात, नाल्यात सोडणे सर्रास झाले आहे. यामुळे नदीतील प्रदूषण वाढते तसेच पेयजलावरही याचा परिणाम होतो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले

बायोमिथेन प्लांट उभारणार : नगराध्यक्ष

साखळी नगरपालिका कचऱ्याविषयी अत्यंत गंभीर आहे. पालिकेने आतापर्यंत कचरा उचल प्रक्रियेत बरीच सुधारणा केली आहे. तरीही उघड्यावर तसेच रस्त्याबाजूला कचरा फेकणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलणे आवश्‍यक झाले आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प चांगल्या पध्दतीने चालत असून तेथे आता मुख्यमंत्री निधीतून साडेतीन कोटी रुपये खर्च करून बायोमिथेन प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असे यावेळी नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com