अतिवेगाची नशा नडतेय! गोव्यात या ठिकाणी झाले सर्वाधिक अपघात

गोव्यात सहा महिन्यांत दहा अपघाती मृत्‍यू
Goa Accident case
Goa Accident caseDainik Gomantak

सासष्टी : सासष्टी तालुक्यात गेल्या सहा महिन्यांत विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 10 जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्याशिवाय एकूण बावीसच्या आसपास झालेल्या किरकोळ अपघातात चालकांबरोबर पादचारीही जखमी झालेले आहेत. तर अनेकजण जायबंदीही झाले आहेत. सासष्टी तालुक्यातील सर्व पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या अपघातांचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाढलेले दिसून येत आहे.

वाहन चालकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. वाहन चालक नियमांचे उल्लंघन करतात, त्‍यात युवा वर्गाचा सर्वाधिक समावेश आहे. तसेच काहीजण दारुच्या नशेत अतिवेगाने वाहन चालवित असल्यामुळे अपघात होतात.

- प्रबोध शिरवईकर, वाहतूक पोलिस उपअधीक्षक.

Goa Accident case
Goa Politics: 'त्यांच्यामागे सावलीसारखा वावरलो, पोलिसांचा मारही खाल्ला, पण...'

येथे झाले अपघात?

सासष्टी तालुक्यात मडगाव, फातोर्डा, मायणा कुडतरी, कुंकळ्ळी आणि कोलवा ही पोलिस स्थानके येत आहेत. या सर्व पोलिस स्थानकांच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांत झालेल्या अपघातात एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या 10 अपघातांपैकी कुंकळ्ळीत 4, कोलवात 3, मडगाव, फातोर्डा आणि मायणा कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत प्रत्येकी एक जीवघेणा अपघात घडला आहे.

Goa Accident case
Goa Curfew: कसिनो व्यावसायिक Unlock च्या प्रतिक्षेतच

कुडतरीत सात अपघात नोंद

सासष्टी तालुक्यातील सर्व पोलिस ठाण्यात एकूण 22 किरकोळ अपघात झाले असून मडगावमध्ये 4 मायणा कुडतरीत 7, कुंकळ्ळी, कोलवा आणि फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 3 किरकोळ अपघात घडलेले आहेत. सासष्टी तालुक्यात गेल्या वर्षीची तुलना केल्यास सुरवातीच्या सहा महिन्यांत झालेल्या अपघातांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com