Goa Politics: 'त्यांच्यामागे सावलीसारखा वावरलो, पोलिसांचा मारही खाल्ला, पण...'

बाबूश मोन्सेरात यांचे एकेकाळचे खंदे समर्थक व माजी महापौर टोनी रॉड्रिग्‍स यांनी संताप व्‍यक्त केला.
Babush Monserratte goa
Babush Monserratte goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बाबूश मोन्सेरात (BabushMonserratte) यांना नेहमीच पाठिंबा दिला. त्यांच्या वाईट काळातही त्यांची साथ सोडली नाही. मात्र आता ते सर्वकाही विसरले आहेत. आम्ही त्यांना सहकार्य करत होतो म्‍हणूनच ते आम्हाला निवडणुकीत (Goa Election) मदत करत होते. त्यामध्ये आमची स्वतःचीही मेहनत होती. आम्ही घरी बसून निवडून येत नव्‍हतो, असा संताप मोन्सेरात यांचे एकेकाळचे खंदे समर्थक व माजी महापौर टोनी रॉड्रिग्‍स (Tony Rodrigues) यांनी व्‍यक्त केला.

‘काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर असलेल्या टोनी रॉड्रिग्स यांना मीच निवडून आणत होतो’ असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केले होते. त्यावर बोलताना टोनी म्‍हणाले की, निवडणुकीत मदत करण्यात त्यांचा एकट्याचाच वाटा नव्हता, तर आम्हीसुद्धा मेहनत घेत होतो. आम्ही घरी बसून या निवडणुका जिंकलेल्या नाहीत. बाबूश हेसुद्धा कार्यकर्त्यांच्या मदतीने निवडणूक जिंकत आले आहेत हे त्यांनी ध्यानात ठेवायला हवे. २००८ साली पणजी पोलिस स्थानकावरील दगडफेक आंदोलनात मला पोलिसांकडून जबर मारहाण झाली होती. तसेच न्यायालयाच्या पायऱ्याही चढण्याची वेळ आली होती. तरीही कधी त्यांना आम्ही दुखावले नाही. त्यांच्या सुख-दुःखात नेहमीच सामील असायचो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते पूर्णपणे बदलले आहेत, असे ते म्‍हणाले.

Babush Monserratte goa
Goa: कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती घडविणारे मनोज

मनपा निवडणुकीपासून बाबूश बदलले

बाबूश मोन्सेरात यांच्याशी माझे वैर किंवा भांडण झालेले नाही. पणजी महापालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे त्‍यांनी 2016 च्या निवडणुकीत सांगितल्याने मीसुद्धा तेव्हा उमेदवारीसाठी जोर धरला नाही. राजकारणातून जरा बाजूला होऊन माझ्या बांधकाम व्यवसायाकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. मात्र मोन्सेरात यांनी कधीही हाक दिली की आम्ही त्याच्या मदतीला धावून जात होतो. मागील पणजी महापालिका निवडणुकीपासून ते स्वार्थीपणाने वागू लागले आहेत. राजकारणात त्यांच्यापेक्षा कोणी वरचढ होण्याचा प्रयत्न करतोय असे दिसल्यास ते त्याला दूर ठेवणे, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाणउतारा करणे आदी तंत्रे ते अवलंबतात, असे टोनी म्‍हणाले.

लोकांना हवा सामान्‍य नेता

ताळगावत जो विकास झाला आहे, तो लोकांच्या हिताच्या दृष्टीने झालेला दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे. लोकांमध्ये मिसळणारा नेता त्यांना हवा आहे. पूर्वी मोन्सेरात लोकांना भेटायचे, गोरगरिबांची दुःखे समजून घ्यायचे. मात्र त्यांच्यात जो बदल झाला आहे तो लोकांना दिसू लागला आहे. सध्या लोकांना त्यांच्या कार्यालयात तिष्ठत उभे राहावे लागते. अशा स्थितीत लोकांना त्यांच्या समस्या जाणून घेईल असा सर्वसामान्य नेता हवा आहे, असे टोनी म्‍हणाले.

Babush Monserratte goa
Goa: मडगाव येथील 'रविंद्र भवन' तियात्र सादरीकरणासाठी खुले

3 सप्‍टेंबरला काँग्रेस प्रवेश

येत्या 3 सप्टेंबरला मी काँग्रेसमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहे. ताळगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्‍छुक आहे. 2002 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी प्रतिस्पर्धी होते सोमनाथ जुवारकर व बाबूश मोन्सेरात. तेव्हा मोन्सेरात हे जिंकून आल्यानंतर मी त्यांच्यात गटात सामील झालो होतो. चारवेळा मी नगरसेवक म्हणून जिंकून आलो. त्यांनी मला तीनवेळा महापौर बनविले. पण अलीकडे बाबूश यांचे विचार बदलल्याने आम्ही आमची वेगळी वाट धरण्‍याचा विचार केला.

"ग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात गेल्या चार महिन्यांपासून विचार सुरू होता. गिरीश चोडणकर यांच्या संपर्कात होतो. भाजप सरकारपेक्षा काँग्रेसचेच सरकार बरे असे मत लोकांमध्ये होऊ लागले आहे. काँग्रेसला ताळगावामध्ये बळकटी देण्यास त्‍या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. चिदंबरम यांना भेटण्यास चोडणकर यांनी बोलावले होते. वरिष्ठांनी उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली आहे."

- टोनी रॉड्रिग्‍स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com