बसमधील प्रवाशाकडे सापडले एक कोटी रुपयांची रोकड, गोव्यातून बंगळुरुला करत होता प्रवास, हवालाचा पैसा असल्याचा संशय

Goa Bengaluru bus cash seizure: मध्यरात्री पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात एक कोटी रुपयांची रोकड आढळून आली.
₹1 crore cash found passenger
Goa Bengaluru bus cash seizureDainik Gomantak
Published on
Updated on

कारवार: बसमधून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांकडे एक कोटी रुपयांचे रोख रक्कम आढळून आली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पैशांबाबत योग्य स्पष्टीकरण आणि आवश्यक कागदपत्रे सादर करु न शकल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार-गोवा सीमेवरील माजली तपासणी नाक्यावर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

कल्पेश (रा. बंगळुरु) आणि बमरा राम (रा. राजस्थान) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही गोव्यातून बंगळुरुच्या दिशेने प्रवास करत होते. बंगळुरुमध्येच ते पैसे घेऊन निघाले होते अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, ते बंगळुरुत कोणाला ते पैसे देणार होते, कशासाठी देणार होते, याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

₹1 crore cash found passenger
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

मध्यरात्री पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात एक कोटी रुपयांची रोकड आढळून आली. गोव्याहून बेंगळुरूमधील होसूर येथे पैसे नेले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेल्या कल्पेश आणि बमरा राम यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पैसे ते गोव्यात कोणाकडून घेऊन बंगळुरूला व्यवसायासाठी घेऊन जात होते.

₹1 crore cash found passenger
पंढरपूरच्या ‘बाबा’चा बेळगावात 2 कोटींचा घपला; घरबसल्या अगरबत्ती उद्योगाच्या नावाखाली 8,000 महिलांना गंडवले

दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता संशयितांना पैशाचा स्त्रोत आणि कागदरत्रं सादर करता आली नाही. चित्तकुल पोलिसांनी पैसे जप्त करत संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, हे पैसे हवालाचे असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com