
म्हापसा मार्केटमधील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेरांची मोडतोड. शनिवारी (30 डिसेंबर) उत्तर रात्रीचा हा प्रकार कॅमेरा फुटेजमध्ये कैद. संशयिताने एकूण तीन दुकानांना बनवले लक्ष.
फक्त धारगळमध्ये नाही तर पूर्ण पेडणे तालुक्यात आम्हाला सनबर्न नको. मला विश्नासात न घेता धारगळमध्ये सनबर्न करण्याचा प्रयत्न. सत्तेत असूनही प्रत्येकवेळी मला लोकांसोबत रस्त्यावर उतरावे लागत आहे. धारगळमध्ये सनबर्न होणार नाही म्हणजे नाही. सोमवारी होणाऱ्या पंचायत बैठकीत सनबर्नला परवानगी दिल्यास मी आता घुसून काय ते दाखवून देईन. पेडण्याचे भाजप आमदार प्रवीण आर्लेकर आक्रमक.
घुरीये व्यवस्थापकीय समितीच्या कोमुनिदादसाठी आज कोमुनिदाद कार्यालय परिसरात निवडणूक पार पडली. अर टुलिओ डीसौजा यांची अध्यक्ष म्हणून तर व्हिक्टर झुझार्टे ॲटर्नी यांनी मेजर आणि रेडेंटो डीसोजा यांनी कोषाध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली.
ओल्ड गोवा येथे सुरू असलेल्या सेंट फ्रांसिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनासाठी साखळी येथून वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
वेर्णा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या छाप्यात रोहन बिंद याला 4.25 लाख रुपये किमतीच्या 4.255 ग्रॅम गांजासह अटक केली. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
थिवी येथील कोमुनिदादची 6.33 लाख चौरस मीटर जमीन खासगी विद्यापीठासाठी विकल्याच्या निषेधार्थ स्थानिकांनी पंचायतीजवळ रॅली काढली. माजी आमदार किरण कांदोळकर व सरपंच व्यंकटेश शिरोडकरही त्यात सामील झाले होते.
वाळपईत रविवारी (दि. 1 डिसेंबर) रोजी सकाळी रन फॉर फिटनेस ही मॅरेथॉन उत्साहात संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी, पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर, डॉ. सूरज काणेकर, डॉ. अशोक आमशेकर, डॉ. ओंकार आमशेकर, डॉ अंकिता आमशेकर व इतर उपस्थित होते. सुमारे 2 हजार नागरिकांनी या उपक्रमात भाग घेतला.
डिचोलीत यंदाही नवा सोमवार उत्सव फेरीत 'गोबी मंच्यूरियन'चे स्टॉल थाटण्यास प्रतिबंध लावण्याचा नवा सोमवार उत्सव समितीचा निर्णय. यंदाच्या वर्षी 9 डिसेंबरला हा उत्सव साजरा होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.