Goa Cricket Team
Goa Cricket TeamDainik Gomantak

Thimmappiah Cricket: गोव्याचा मोसमपूर्व स्पर्धात्मक ‘सराव’ सुरु! विदर्भ, महाराष्ट्राशी भिडणार

Karnataka cricket tournament: गोव्याचा स्पर्धेतील दुसरा सामना ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्राविरुद्ध होईल, तर अखेरचा साखळी सामना १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत केएससीए अध्यक्षीय संघाविरुद्ध खेळला जाईल.
Published on

पणजी: आगामी देशांतर्गत क्रिकेटमधील २०२५-२६ मोसमापूर्वी गोव्याचा स्पर्धात्मक सराव गुरुवारपासून (ता. ४) सुरु होत आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) डॉ. (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेतील त्यांचा पहिला चार दिवसीय सामना विदर्भाविरुद्ध खेळला जाईल.

स्पर्धेत १६ संघ खेळणार असून असून गोव्याचा ब गटात समावेश आहे. केएससीए अध्यक्षीय संघ, विदर्भ व महाराष्ट्र हे गटातील अन्य संघ आहेत. गोव्याचा स्पर्धेतील दुसरा सामना ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्राविरुद्ध होईल, तर अखेरचा साखळी सामना १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत केएससीए अध्यक्षीय संघाविरुद्ध खेळला जाईल. सामने बंगळूर व अळूर येथे होतील.

या स्पर्धेसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने २१ खेळाडूंना निवडले आहे. नवे प्रशिक्षक मिलाप मेवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याची ही पहिली प्रमुख स्पर्धा असेल. त्यांना आगामी मोसमापूर्वी खेळाडूंची चाचपणी करण्याची संधी या स्पर्धेतून लाभत आहे.

Goa Cricket Team
Cricketer Retirement: मिचेल स्टार्क पाठोपाठ आणखी एका खेळाडूची निवृत्ती! आशिया कपपूर्वी मोठा धक्का, पोस्ट करत म्हणाला...

गोव्याच्या सीनियर संघातील नवा पाहुणा क्रिकेटपटू दिल्लीचा ललित यादव यालाही छाप पाडण्याची संधी कर्नाटकातील स्पर्धेतून लाभेल. त्याला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. गोव्याकडून सलग चौथा मोसम खेळणारा अर्जुन तेंडुलकरही संघात आहे. इंग्लंडहून परतलेला स्नेहल कवठणकर, तसेच सुयश प्रभुदेसाई हे अनुभवी खेळाडू संघात दाखल झाले आहेत.

Goa Cricket Team
Kerala Cricket League: 10 चौकार, 18 षटकार! संजू सॅमसनलाही सोडले मागे, केरळ क्रिकेट लीगमध्ये विष्णू विनोदचे 'तूफान'

संघ असा ः मंथन खुटकर, ईशान गडेकर, स्नेहल कवठणकर, सुयश प्रभुदेसाई, दीपराज गावकर, दर्शन मिसाळ, मोहित रेडकर, समर दुभाषी, हेरंब परब, शुभम तारी, विकास सिंग, लखमेश पावणे, आर्यन नार्वेकर, विजेश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा, कश्यप बखले, ऋत्विक नाईक, राजशेखर हरिकांत, अर्जुन तेंडुलकर, शदाब खान, ललित यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com