Virat Kohli: कोहलीचा 'विराट' शो फक्त टीव्हीवरच, स्टेडियममध्ये चाहत्यांना नो-एन्ट्री; 'विजय हजारे ट्रॉफी'बाबत सरकारचा मोठा निर्णय

Vijay Hazare Trophy: भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

बंगळुरू: भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, त्याच्या या ऐतिहासिक खेळीला मैदानातून दाद देण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे. कर्नाटक सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी चाहत्यांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

सुरक्षेचे कारण

२४ डिसेंबरला दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश असा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. सुरुवातीला कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) काही स्टँड्स खुले करून सुमारे २ ते ३ हजार चाहत्यांना प्रवेश देण्याचे नियोजन केले होते.

मात्र, ख्रिसमस आणि सुट्ट्यांचा काळ असल्याने विराट कोहली आणि ऋषभ पंत यांसारख्या स्टार खेळाडूंना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी हाताळणे आणि स्टेडियमची सुरक्षा राखणे कठीण जाईल, या भीतीने सरकारने अखेरच्या क्षणी प्रेक्षकांविना सामना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

Virat Kohli
South Goa: दक्षिण गोव्‍यात 12 महिला विजयी! 10 मतदारसंघ होते राखीव; मंत्री शिरोडकरांची कन्‍या शिरोडा मतदारसंघातून विजयी

रिकाम्या स्टेडियममध्ये रंगणार सामना

दिल्लीचे प्रशिक्षक सरनदीप सिंह यांनी विराट कोहली आंध्र प्रदेशविरुद्ध मैदानात उतरणार असल्याची पुष्टी केली आहे. विराटला आपल्या आवडत्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना पाहणे ही चाहत्यांसाठी मोठी पर्वणी होती.

मात्र, आता हे सामने बंद दाराआड खेळवले जातील. स्टेडियममधील सुरक्षेच्या जुन्या समस्या लक्षात घेता कोणताही धोका पत्करायला प्रशासन तयार नाही, त्यामुळे विराटला 'एम्पटी स्टँड्स'समोर आपली फलंदाजी दाखवावी लागणार आहे.

Virat Kohli
Goa ZP Election Result: 'जनतेने भाजप सरकार, मोदींवरील विश्‍‍वास पुन्‍हा सार्थ ठरवला'! CM सावंतांचे प्रतिपादन; भाजपचा विजयोत्सव

मैदानात जाता येत नसले तरी, चाहत्यांना हा सामना डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. विजय हजारे ट्रॉफीचे निवडक सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केले जाणार आहेत.

तसेच, जे चाहते मोबाईलवर सामना पाहू इच्छितात, त्यांच्यासाठी जिओ-हॉटस्टार (JioHotstar) वर लाईव्ह स्ट्रीमिंगची सोय उपलब्ध असेल. त्यामुळे स्टेडियममध्ये जाण्याची संधी हुकली असली तरी, विराटची फटकेबाजी स्क्रीनवर पाहता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com