Vinoo Mankad Trophy: प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आला अंगलट! विदर्भाची गोव्यावर सहज मात; 161 धावांत गुंडाळला डाव

Goa Vs Vidarbha Cricket: दिशांक मिस्कीन (४०) व कर्णधार यश कसवणकर (३२) यांचा अपवाद वगळता गोव्याचे फलंदाज विदर्भाच्या प्रभावी गोलंदाजीचा सामना करू शकले नाहीत.
Goa Cricket Team
Goa Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विनू मांकड करंडक १९ वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विदर्भाने गोव्यावर सहा विकेट राखून सहज मात केली. एलिट अ गटातील सामना गुरुवारी हरियानातील झज्जर येथील सेहवाग इंटरनॅशनल स्कूल मैदानावर झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा गोव्याचा निर्णय अंगलट आला. त्यांचा डाव ४६ षटकांत १६१ धावांत आटोपला. दिशांक मिस्कीन (४०) व कर्णधार यश कसवणकर (३२) यांचा अपवाद वगळता गोव्याचे फलंदाज विदर्भाच्या प्रभावी गोलंदाजीचा सामना करू शकले नाहीत.

दिशांक व यश जोडीने चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली, मात्र कर्णधार धावबाद होणे गोव्यासाठी खूपच नुकसानकारक ठरले. उत्तरादाखल विदर्भाने ४२.५ षटकांत ४ बाद १६२ धावा करून सामना जिंकला. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना शनिवारी (ता. ११) बडोदा संघाविरुद्ध होईल.

Goa Cricket Team
Goa Ranji Cricket: गोव्याला मिळणार नवा कर्णधार? रणजी संघाला नेतृत्वबदलाचे वेध; 15 ऑक्टोबरपासून एलिट गटाची मोहीम

संक्षिप्त धावफलक ः गोवा ः ४६ षटकांत सर्वबाद १६१ (आदित्य कोटा १४, आराध्य गोयल ५, शंतनू नेवगी ९, यश कसवणकर ३२, दिशांक मिस्कीन ४०, वेदांत डब्राल १८, चिरुगुपती व्यंकट १३, प्रियांशू वर्मा ९, समर्थ राणे ०, शिवेन बोरकर १, पियुष देविदास नाबाद ०, टी. यश ४-३७, हिमांशू कवळे २-२६)

Goa Cricket Team
Goa Ranji Cricket: गोव्याच्या मोहिमेला यंदा घरच्या मैदानावर आरंभ! चंदीगडसोबत रंगणार सामना; 15 ऑक्टोबरपासून थरार

पराभूत वि. विदर्भ ः ४२.५ षटकांत ४ बाद १६२ (गौरव ३१, ए. लुंगे नाबाद ५७, ओम धोत्रे नाबाद ३८, समर्थ राणे ७-१-२०-१, चिगुरुपती व्यंकट ७-०-२५-१, पियुष देविदास ५.५-०-३६-०, शिवेन बोरकर १०-१-२८-०, यश कसवणकर १०-१-२८-१, आराध्य गोयल १-०-२-०, वेदांत डब्राल २-०-१२-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com