
Panaji News: झारखंडच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजावर जोरदार हल्ला चढवत संघाला २३ वर्षाखालील एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय मिळवून दिला. त्यांनी रविवारी रायपूर येथील आरडीसीए स्टेडियमवर झालेला सामना तब्बल १२९ धावांनी जिंकला.
स्पर्धेच्या ‘ड’ गटातील या सामन्यात गोव्याने नाणेफेक जिंकून झारखंडला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. त्यांनी निर्धारित ५० षटकात नऊ गडी गमावून ३४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात गोव्याला साडेतीनशे धावांचे आव्हान पेलले नाही. त्यांचे सर्व गडी ३९.१ षटकांत २२० गावात गारद झाले. गोव्याच्या (Goa) गौरेश कांबळी (६८ धावा, ५१ चेंडू, ११ चौकार, १ षटकार) आणि आर्यन नार्वेकर (५७ धावा, ७२ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) यांनी अर्धशतके केली, पण आव्हान कठीणच ठरले. त्यातच आर्यन आणि कर्णधार शिवेंद्र भुजबळ धावबाद झाल्याने गोव्याचे मोठे नुकसान झाले.
त्यापूर्वी, झारखंडला शिखर मोहन व आर्यन हुडा यांनी २०.१ षटकांत १२० धावांची दणकेबाज सलामी दिली. शिखर याने ६८ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह ६२ धावा केल्या, तर आर्यन याने ६६ चेंडूंत आठ चौकार व एक षटकारसह ६६ धावा केल्या. नंतर सत्या सेतू आणि राजन दीप यांनीही अर्धशतके नोंदविताना झारखंडला अडीचशेचा टप्पा गाठून दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली.
सत्या याने ६१ चेंडूंत पाच चौकार व तीन षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. तुलनेत जास्त आक्रमक असलेल्या राजन याने ४० चेंडूंत पाच चौकार व चार षटकार लगावताना ६३ धावा नोंदविल्या. त्यामुळे झारखंडला (Jharkhand) मोठी धावसंख्या रचणे शक्य झाले. गोव्यातर्फे वेगवान गोलंदाज लखमेश पावणे याने चार गडी बाद केले.
झारखंड ः ५० षटकांत ९ बाद ३४९ (शिखर मोहन ६२, आर्यन हुडा ६६, सत्या सेतू ६३, रॉबिन मिन्झ १९, राजन दीप ६३, शुभ शर्मा २३, कौनैन कुरैशी २०, शिवम प्रताप सिंग १०-१-५५-२, लखमेश पावणे १०-१-७०-४, सनिकेत पालकर ४-०-३६-१, यश कसवणकर १०-०-५१-०, शदाब खान ८-०-६७-०, कुतबुदिन जमादार ५-०-३६-१, अझान थोटा ३-०-२९-०) वि. वि. गोवा ः ३९.१ षटकांत सर्वबाद २२० (अझान थोटा १५, गौरेश कांबळी ६८, कौशल हट्टंगडी १८, यश कसवणकर ३, आर्यन नार्वेकर ५७, शिवेंद्र भुजबळ २, लखमेश पावणे १, सनिकेत पालकर १८, कुतबुदिन जमादार ९, शदाब खान नाबाद १८, शिवम प्रताप सिंग ०, साहिल राज ४-०-२९-१, शुभ शर्मा ५-०-४३-२, शमशाद ६.१-०-२३-१, ओम सिंग ८-०-५०-१, कौनेन कुरैशी १०-०-४६-२).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.