Goa Cricket: गोव्यासमोर सामना वाचविण्याचे कठीण आव्हान! अजूनही ३१० धावांची पिछाडी

Thimmappiah Cricket Tournament: छत्तीसगडच्या आठव्या विकेटच्या दीडशतकी भागीदारीमुळे त्यांनी डावात ४६७ धावांपर्यंत मजल मारली
Thimmappiah Cricket Tournament: छत्तीसगडच्या आठव्या विकेटच्या दीडशतकी भागीदारीमुळे त्यांनी डावात ४६७ धावांपर्यंत मजल मारली
CricketCanva
Published on
Updated on

Thimmappiah Cricket Tournament 2024

पणजी: फक्त दोघा फिरकी गोलंदाजांवर अवलंबून असलेल्या गोव्याची मंगळवारी छत्तीसगडच्या शशांक सिंग याने तुफानी धुलाई करताना धडाकेबाज शतक नोंदविले. सुमित रुईकर यानेही दमदार फलंदाजी केली. आठव्या विकेटच्या दीडशतकी भागीदारीमुळे त्यांनी पहिल्या डावात ४६७ धावांपर्यंत मजल मारली.

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या कॅप्टन के. थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेतील चार दिवसीय सामना अळूर-बंगळुरू येथे सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गोव्याची पहिल्या डावात ४ बाद १५७ अशी स्थिती झाली होती. अजून ३१० धावांनी मागे असल्यामुळे सामना वाचविण्याचे गोव्यासमोर कठीण आव्हान आहे.

मध्य प्रदेशविरुद्ध अगोदरच्या लढतीत पहिल्या डावात अर्धशतक केलेल्या अभिनव तेजराणा याची नाबाद ४३ धावांची खेळी दिलासा देणारी ठरली. सलामीचा ईशान गडेकर याने आक्रमक शैलीत ४५ धावा केल्या; पण अनुभवी स्नेहल कवठणकरसह रोहन कदम व के. व्ही. सिद्धार्थ हे पाहुणे क्रिकेटपटू अपयशी ठरले. छत्तीसगडचे नेतृत्व करणाऱ्या शशांक सिंगने गोव्याच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. जोरदार टोलेबाजी करताना त्याने अवघ्या १३१ चेंडूंत सात चौकार व आठ उत्तुंग षटकारांसह १३६ धावा केल्या.

त्याने सुमित रुईकर याच्यासमवेत आठव्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. सुमितने नवव्या विकेटसाठी आशिष चौहान याच्यासह ४० धावांची भागीदारी करून गोव्याला सतावले. सुमित ८६ धावांवर नाबाद राहिला. गोव्यातर्फे मोहित रेडकर व दर्शन मिसाळ यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले; पण ते महागडे ठरले.

Thimmappiah Cricket Tournament: छत्तीसगडच्या आठव्या विकेटच्या दीडशतकी भागीदारीमुळे त्यांनी डावात ४६७ धावांपर्यंत मजल मारली
Goa Cricket: छत्तीसगडच्या धावसंख्येला लगाम! अखेरच्या सत्रात गोव्याच्या गोलंदाजांनी दाखवली चमक

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड, पहिला डाव (७ बाद २८९) १३५.४ षटकांत सर्वबाद ४६७ (शशांक सिंग १३६, सुमित रुईकर नाबाद ८६, आशिष चौहान ९, प्रवीणकुमार यादव ०, लक्ष्य गर्ग १६-१-४९-०, अर्जुन तेंडुलकर २४-५-७४-२, विजेश प्रभुदेसाई २३-७-६०-०, दीपराज गावकर ८-४-२७-०, मोहित रेडकर ३५-२-१४०-४, दर्शन मिसाळ २९.४-२-१०७-४).

गोवा, पहिला डाव ४४ षटकांत ४ बाद १५७ (रोहन कदम १७, ईशान गडेकर ४५, अभिनव तेजराणा नाबाद ४३, स्नेहल कवठणकर ३, के.व्ही. सिद्धार्थ २८, दीपराज गावकर नाबाद १५, सुमित रुईकर २-६०, शुभम अग्रवाल १-३५, सानिध्य हुरकत १-१५).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com