Cash For Job: आणखी एक ठकसेन! विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडले

Goa Job Fraud: चिंचोणे येथील अस्लम मकानदार याने सरकारी नोकरी तसेच विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडल्याची घटना समोर आली आहे.
Cash For Job, goa government job scam, goa job fraud
Cash For Job ScamCanva
Published on: 
Updated on: 

मडगाव: चिंचोणे येथील अस्लम मकानदार याने सरकारी नोकरी तसेच विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडल्याची घटना समोर आली आहे.

नावेली येथील फातिमा फर्नांडिस या महिलेने आज सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह मडगाव पोलिस स्थानक गाठून या ठकसेनाच्या विरोधात तक्रार दिली. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आपण एका राजकारण्याच्या जवळचा असून तुला त्याच्यामार्फत सरकारी कार्यालयात शिपायाची नोकरी देतो, असे सांगून अस्लमने तिच्याकडून २ लाख रुपये मागितले.

मात्र, त्या महिलेकडे तेवढे पैसे नसल्याने तिने सोन्याचे दागिने त्याच्या स्वाधीन केले. अस्लमने ते दागिने फायनान्स कंपनीकडे तारण ठेवून त्यावर कर्ज काढले.

Cash For Job, goa government job scam, goa job fraud
Goa Cabinet: मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच? मुख्यमंत्री सावंत म्हणाले की पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसारच....

शिवाय अझर शेख या युवकाला आखाती देशात नोकरीचे आश्वासन देऊन त्याच्याकडून साडेपाच लाख रुपये उकळले. मात्र, त्याला ही नोकरी मिळाली नाही. अन्य एका महिलेला विदेशात पाठवितो, असे सांगून तिच्याकडून तीन लाख रुपये आणि नंतर सोन्याचे दागिने घेतले आणि तिलाही फसविले, अशी माहिती प्रतिमा कुतिन्हो यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Viral Post
Gomantak TV Engineers Excellence Awards
1.5 crore salary job viral story
Goa Government Job Opportunities
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com