Suryakumar Yadav: सूर्यकुमार आणि देविशा साईंच्या चरणी, इंग्लंड मालिकेपूर्वी शिर्डीत घेतला आशीर्वाद Watch Video

Suryakumar Yadav Shirdi visit: या जोडप्याचा साई मंदिरात प्रार्थना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Suryakumar Yadav latest news
Suryakumar Yadav latest newsDainik Gomantak
Published on
Updated on

शिर्डी: भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी शिर्डीला भेट दिली आणि साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले. या जोडप्याचा साई मंदिरात प्रार्थना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार आणि देविशा काही पुजाऱ्यांच्या मदतीने विधी करताना दिसत आहेत. मंदिर भेटीनंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सूर्यकुमार आणि देविशा यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आणि सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी देखील उपस्थित होते.

श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार आणि देविशा मंदिराच्या आवारात प्रवेश करताना दिसत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत हे जोडपे थेट गर्भगृहात गेले आणि त्यांनी साईबाबांच्या मूर्तीसमोर हात जोडले. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की "भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले."

सूर्यकुमार यादव सध्या इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेच्या तयारीला लागला आहे. पाच सामन्यांची ही मालिका २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. सूर्यकुमारने भारतासाठी शेवटचा सामना नोव्हेंबर २०२४ मध्ये खेळला होता.

Suryakumar Yadav latest news
Suryakumar Yadav: "एकदम बकवास!! स्क्रिप्टरायटर आहेस की पत्रकार?" गोव्याच्या टीममध्ये सामील होण्याच्या बातम्यांवर सूर्या 'भडकला'

त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि भारताने ती मालिका जिंकली होती. भारत आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

सूर्यकुमार आता इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत जोरदार पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर तो टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. २०२१ मध्ये पदार्पण केल्यापासून, सूर्यकुमारने ७८ टी-२० सामन्यांमध्ये ४० च्या सरासरीने २५७० धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com