Suryakumar Yadav: सूर्यकुमारवर जर्मनीत झाली सर्जरी! IPL मध्ये करणार पुनरागमन?

Suryakumar Yadav Surgery: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादववर जर्मनीमध्ये यशस्वी सर्जरी करण्यात आली आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavX/surya_14kumar

India batter Suryakumar Yadav undergoes surgery after suffering from sports hernia:

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. याबद्दल त्याने गुरुवारी (18 जानेवारी) माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की सूर्यकुमारला स्पोर्ट्स हार्नियाची समस्या जाणवत असून त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. आता त्यानेच त्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज असलेला सूर्यकुमार दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी20 मालिकेतील शेवटचा सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. जोहान्सबर्गला झालेल्या त्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना त्याचा पाय मुरगळ्याचे दिसले होते.

त्यानंतर मात्र त्याची दुखापत गंभीर असल्याचे समजले होते. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच त्याच्या स्पोर्ट्स हार्नियाचे निदान झाल्याचे समोर आले होते. आता त्याच्यावर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav: 6,6,6,6, ऑस्ट्रेलियाची पळता भूई थोडी! सूर्याची तुफानी बॅटिंग, पाहा Video

दरम्यान, आता लवकरच पुनरागमन करण्यावर लक्ष असेल, असे सूर्यकुमारने म्हटले आहे. त्याने त्याच्या शस्त्रक्रियेबद्दल पोस्ट करताना लिहिले की 'शस्त्रक्रिया पूर्ण झाली. माझी काळजी करणाऱ्या आणि माझ्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार. मला हे सांगताना आनंद होत आहे की मी लवकरच परत येणार आहे.'

सूर्यकुमार दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यापासून क्रिकेट खेळलेला नाही. आता त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने तो पुन्हा कधी पुनरागमन करणार असा प्रश्न आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav: सूर्या पुन्हा 'ICC T20 क्रिकेटर ऑफ द इयर' च्या शर्यतीत; या खेळाडूंचे कडवे आव्हान

दरम्यान, या शस्त्रक्रियेतून बाहेर येण्यासाठी सूर्यकुमारला साधारण एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तो आयपीएल 2024 हंगामातून पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारताला जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळायची आहे. अशात त्यापूर्वी सूर्यकुमार पूर्ण तंदुरुस्त व्हावा आणि फॉर्ममध्ये असावा अशी अपेक्षा भारतीय संघव्यवस्थापनाची असेल. कारण सूर्यकुमार टी20 क्रिकेटमधील महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याची टी२० मधील आकडेवारीही शानदार आहे.

सूर्यकुमार सध्या टी20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावरही आहे. त्याने 60 सामने खेळले असून 45.55 च्या सरासरीने 4 शतके आणि 17 अर्धशतकांसह 2141 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com