Suryakumar Yadav: "एकदम बकवास!! स्क्रिप्टरायटर आहेस की पत्रकार?" गोव्याच्या टीममध्ये सामील होण्याच्या बातम्यांवर सूर्या 'भडकला'

Suryakumar Yadav Goa: सूर्यकुमार यादव गोव्यात स्थलांतर करण्याचा विचार करत असून, तो अनेक खेळाडूंना सोबत घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे
Suryakumar Yadav Tweet
Suryakumar Yadav Tweet Dainik Gomantak
Published on
Updated on

Suryakumar Yadav News: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुंबईतील युवा क्रिकेटपटूंच्या एका गटाने आगामी हंगामापूर्वी गोव्याच्या संघासाठी स्थलांतर करण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आल्याने मुंबई क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बातमीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (MCA) ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितल्यानंतर या वृत्ताला उधाण आले.

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या बातमीनुसार, सूर्यकुमार यादव गोव्यात स्थलांतर करण्याचा विचार करत असून, तो अनेक खेळाडूंना सोबत घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे. गोव्याला नुकतीच रणजी ट्रॉफी एलिट लीगमध्ये बढती मिळाली असल्याने युवा खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशन प्रयत्नशील आहे.

मात्र, या बातमीवर सूर्यकुमार यादवने तीव्र नाराजी व्यक्त केली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमारने सोशल मीडियावर या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत, "लेखक आहेस की पत्रकार? हसायचं असेल तर मी विनोदी चित्रपट पाहणं सोडून हे लेख वाचायला सुरुवात करेन. एकदम बकवास," असं म्हणत एक पोस्ट शेअर केली.

यशस्वी जयस्वालने मुंबई सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे गोवा क्रिकेट असोसिएशनने त्याला दिलेली नेतृत्व भूमिका. "मी आज जे काही आहे ते मुंबईमुळेच आहे. या शहराने मला घडवले आहे आणि आयुष्यभर मी MCA चा ऋणी राहीन," असे यशस्वी जयस्वाल म्हणाला आहे.

Suryakumar Yadav Tweet
Indian Cricketers: पहा आपल्या आवडत्या क्रिकेटर्सचे Ghibli Style Photos

या घटनेमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि गोवा क्रिकेट असोसिएशन यांच्यातील संबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे मुंबई क्रिकेटमधील युवा खेळाडूंच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com