IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Simon Harmer KL Rahul: राहुलला दक्षिण आफ्रिकेचा ऑफ-स्पिनर सायमन हार्मर याने त्रिफळाचीत केले. हार्मरच्या हातातील चेंडू ऑफ स्टंपवर पडला आणि त्याने जबरदस्त टर्न घेतला.
Simon Harmer KL Rahul
Simon Harmer KL RahuDainik Gomantak
Published on
Updated on

Simon Harmer KL Rahul: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर विजयासाठी 549 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची दुसऱ्या डावातही सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली.

राहुल आणि जैस्वाल पुन्हा फ्लॉप

पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल दुसऱ्या डावातही फार काळ टिकाव धरु शकला नाही. तो अवघ्या 13 धावा करुन माघारी परतला. त्याला केशव महाराजने माघारी पाठवले. यानंतर अनुभवी फलंदाज केएल राहुल सुद्धा फलंदाजीमध्ये अपयशी ठरला. राहुलने 29 चेंडू खेळले, पण त्याला फक्त 6 धावाच करता आल्या. तो अत्यंत संथ गतीने खेळत होता.

Simon Harmer KL Rahul
IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीत षटकारांचा 'पाऊस'! मार्को यानसेनने रचला नवा इतिहास; दिग्गज व्ही व्ही रिचर्डसन यांचा मोडला 40 वर्षे जुना रेकॉर्ड VIDEO

राहुलला दक्षिण आफ्रिकेचा ऑफ-स्पिनर सायमन हार्मर याने त्रिफळाचीत केले. हार्मरच्या हातातील चेंडू ऑफ स्टंपवर पडला आणि त्याने जबरदस्त टर्न घेतला. चेंडू वेगाने आतमध्ये आला, राहुलला तो समजला नाही आणि चेंडू बॅट आणि पॅडमधून निघून थेट मिडल स्टंप घेऊन उडाला. खेळपट्टीवरुन मिळालेला इतका मोठा टर्न पाहून खुद्द राहुलही पूर्णपणे अवाक झाला. जैस्वाल आणि राहुल लवकर बाद झाल्यामुळे टीम इंडियावर सुरुवातीलाच मोठा दबाव आला.

दक्षिण आफ्रिकेने ठेवले आव्हान

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने (South Afirca) आपला दुसरा डाव 5 विकेट्स गमावून 260 धावांवर घोषित केला. दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्स याने उत्कृष्ट फलंदाजी करत180 चेंडूंमध्ये 94 धावांची दमदार खेळी खेळली आणि तो शतक पूर्ण करण्यापासून फक्त 6 धावांनी चुकला. टॉनी डी जॉर्जी याने 68 चेंडूंमध्ये 49 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. तर रायन रिकेल्टन 35 आणि वियान मुल्डर 35 धावा करुन नाबाद राहिले. भारताकडून गोलंदाजीत रवींद्र जडेजाने 4 बळी घेतले.

Simon Harmer KL Rahul
IND vs SA 2nd Test: 'करो या मरो' कसोटीत भारत रचणार इतिहास, वर्ल्ड क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरणार तिसरा देश; इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या यादीत होणार सामील

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावातील 288 धावांची मोठी आघाडी घेऊन दुसऱ्या डावात 260 धावा जोडल्या. त्यामुळे भारतासमोर 549 धावांचे मोठे लक्ष्य आहे. पहिल्या डावात भारतीय संघ (Team India) केवळ 201 धावांवर ऑल आऊट झाला होता. सध्याच्या निराशाजनक सुरुवातीमुळे टीम इंडियासाठी हा सामना वाचवणे किंवा जिंकणे हे अत्यंत कठीण आव्हान असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com