IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीत षटकारांचा 'पाऊस'! मार्को यानसेनने रचला नवा इतिहास; दिग्गज व्ही व्ही रिचर्डसन यांचा मोडला 40 वर्षे जुना रेकॉर्ड VIDEO

Marco Jansen Most Sixes: अष्टपैलू खेळाडू मार्को येनसेन याने आपल्या झंझावाती खेळीने वेस्ट इंडिजचे महान खेळाडू व्हिव्ही रिचर्ड्सन यांचा 40 वर्षांहून अधिक जुना विक्रम मोडत इतिहास रचला.
Marco Jansen Record
Marco JansenDainik Gomantak
Published on
Updated on

Marco Jansen Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पहिल्या डावात शानदार फलंदाजी करत संघाचा स्कोर 489 धावांपर्यंत पोहोचवला. या डावात सेनुरन मुथुसामी आणि मार्को यानसेन (Marco Jansen) यांनी लक्षणीय कामगिरी केली. विशेषतः, अष्टपैलू खेळाडू मार्को यानसेन याने आपल्या झंझावाती खेळीने वेस्ट इंडिजचे महान खेळाडू व्ही व्ही रिचर्ड्सन यांचा 40 वर्षांहून अधिक जुना विक्रम मोडत इतिहास रचला.

यानसेनचा षटकारांचा विश्वविक्रम

मार्कोने 91 चेंडूंत 6 चौकार आणि 7 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 93 धावांची दमदार खेळी खेळली. मात्र, तो केवळ 7 धावांनी आपले पहिले कसोटी शतक पूर्ण करण्यापासून चुकला. यानसेनने आपल्या या 93 धावांच्या खेळीत एकूण 7 षटकार मारले, जो भारताविरुद्ध, भारतात (India) खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या एका डावात कोणत्याही फलंदाजाने मारलेला सर्वात जास्त षटकारांचा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम व्ही व्ही रिचर्ड्सन यांच्या नावावर होता. त्यांनी 1947 मध्ये दिल्ली कसोटीत भारताविरुद्ध एका डावात 6 षटकार मारले होते. ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू हेडन (2001 मध्ये चेन्नई कसोटीत) ने 6 षटकार मारले होते.

Marco Jansen Record
IND vs SA 2nd Test: 'करो या मरो' कसोटीत भारत रचणार इतिहास, वर्ल्ड क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरणार तिसरा देश; इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या यादीत होणार सामील

दक्षिण आफ्रिकेचा विशाल स्कोर

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाने पहिल्या डावात सर्वबाद होईपर्यंत 489 धावांचा डोंगर उभा केला. सेनुरन मुथुसामी याने 206 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 2 षटकारांसह 109 धावा काढत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. पहिल्या दिवशी 6 विकेट्स गमावून 247 धावा केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी तळाच्या चार फलंदाजांनी मिळून 242 महत्त्वपूर्ण धावा जोडल्या, ज्यामुळे संघ 489 च्या मोठ्या स्कोरपर्यंत पोहोचला.

Marco Jansen Record
IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीपूर्वी मोठा धक्का, शुभमन गिलनंतर आणखी 3 खेळाडू रुग्णालयात दाखल; कारण काय?

भारतीय गोलंदाजांची कामगिरी

भारतीय गोलंदाजांमध्ये फिरकीपटू कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात बिनबाद 9 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com