SAFF Women's Championship: भारत, बांगलादेश एकाच गटात खेळणार; गोव्यात होणाऱ्या सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेची गटवारी जाहीर

SAFF Women's Championship 2026 Goa: गोव्यात होणाऱ्या सॅफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ बुधवारी काढण्यात आला, त्यानुसार पाच वेळचा विजेता यजमान भारत आणि गतविजेता बांगलादेश संघ एकाच गटात आले आहेत.
SAFF Women's Championship
SAFF Women's ChampionshipDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात होणाऱ्या सॅफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ बुधवारी काढण्यात आला, त्यानुसार पाच वेळचा विजेता यजमान भारत आणि गतविजेता बांगलादेश संघ एकाच गटात आले आहेत. मालदीव ब गटातील तिसरा संघ आहे.

एकूण सहा संघांची समावेश असलेली स्पर्धा २५ मेपासून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळली जाईल. दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाचे (सॅफ) सचिवालय बांगालदेशमधील ढाका येथे असून तेेथे बुधवारी दुपारी ड्रॉ काढण्यात आला. अ गटात गतउपविजेता नेपाळ, श्रीलंका व भूतान हे संघ आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पात्र ठरतील.

SAFF Women's Championship
Goa Politics: केजरीवालांबाबत भाजपकडून दिशाभूल! वाल्मिकी नाईक यांची आमदार साळकर यांच्‍यावर टीका

सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धेचा ड्रॉ फिफाच्या महिला जागतिक फुटबॉल क्रमवारीनुसार झाला. २१ एप्रिल रोजीच्या फिफा महिला क्रमवारीत भारत ६९व्या, नेपाळ ८७व्या, बांगलादेश ११२ व्या, श्रीलंका १६२ व्या, भूतान १६४ व्या, तर मालदीव १६७ व्या क्रमांकावर आहे.

क्रमवारीनुसार ड्रॉसाठी भारत व नेपाळ, बांगलादेश व श्रीलंका, भूतान व मालदीव अशी विभागणी करण्यात आली होती. यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या एएफसी आशिया कप महिला फुटबॉल स्पर्धेत भारत व बांगलादेश संघ खेळले होते.

भारतात दुसऱ्यांदा स्पर्धा

सॅफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा भारतात दुसऱ्यांदा होत आहे. २०१६ मध्ये पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे स्पर्धा झाली होती व तेव्हा भारताने स्पर्धा चौथ्यांदा जिंकली होती. गोव्यातील फातोर्डा येथेही सॅफ स्पर्धा दुसऱ्यांदा खेळली जात आहे.

SAFF Women's Championship
Goa Teacher Recruitment: 760 जण 'सीबीटी-2' साठी पात्र, यादी जाहीर; 390 जणांची होणार भरती

१९९९ मध्ये पुरुषांची सॅफ अजिंक्यपद स्पर्धा गोव्यात झाली होती व तेव्हा भारताने अंतिम लढतीत बांगलादेशला नमविले होते. सॅफ महिला स्पर्धा भारताने सर्वाधिक पाच वेळा (२०१०, २०१२, २०१४, २०१६, २०१९) जिंकली आहे. मागील दोन वेळेस (२०२२ व २०१४) बांगलादेशने या स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com