भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. भारत आणि इंग्लंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आमनेसामने आहेत. कटकमध्ये खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले असून, सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि कुलदीप यादव यांच्या जागी विराट कोहली आणि वरुण चक्रवर्ती यांना संधी देण्यात आली आहे.
दुखापतीमुळे विराट कोहली पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकला नाही. कुलदीपला विश्रांती देण्यात आली आहे, ज्यामुळे चक्रवर्तीला पदार्पणाची संधी मिळाली आहे.
कर्णधार रोहित शर्माने आज (९ फेब्रुवारी) एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून ५० वा सामना खेळत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा तो आठवा भारतीय कर्णधार आहे.
सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने २०० एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. मोहम्मद अझरुद्दीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अझरुद्दीनने १७४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. सौरव गांगुली १४७ एकदिवसीय सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.