Ranji Trophy: गोव्याच्या फलंदाजांची दमदार कामगिरी! 209 धावांची आघाडी; मोहितचे बळींचे अर्धशतक

Ranji Trophy 2024: गोव्याचा अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकर याला महत्त्वाच्या क्षणी सूर गवसला. त्याने नऊ डावानंतर अर्धशतकी खेळी करताना सलामीचा रोहन कदम याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
Ranji Trophy 2024: गोव्याचा अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकर याला महत्त्वाच्या क्षणी सूर गवसला. त्याने नऊ डावानंतर अर्धशतकी खेळी करताना सलामीचा रोहन कदम याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
Goa CricketCanva
Published on
Updated on

Ranji Trophy Goa VS Nagaland

पणजी: गोव्याचा अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकर याला महत्त्वाच्या क्षणी सूर गवसला. त्याने नऊ डावानंतर अर्धशतकी खेळी करताना सलामीचा रोहन कदम याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली, त्यामुळे रणजी करंडक प्लेट गट क्रिकेट सामन्यात नागालँडविरुद्ध यजमान संघाला एकूण आघाडी २०९ धावांपर्यंत वाढवता आली.

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात रविवारी दुसऱ्या दिवशी नागालँडचा डाव १४७ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे गोव्याला पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळाली. नंतर नागालँडचे फिरकी गोलंदाज जे. सुचित व राँगसेन जोनाथन यांनी दुसऱ्या डावात गोव्याची स्थिती ३ बाद ४९ अशी केली.

खेळपट्टी फिरकीस साथ देत असताना गोव्याचा संघ संकटात होता. स्नेहलने रोहनला छान साथ दिली. खराब चेंडूंसाठी थांबत त्यांनी शांतपणे फलंदाजी करताना संघाच्या डावाला उभारी दिली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या १०६ धावांच्या भागीदारीमुळे गोव्याला दिलासा मिळाला.

सुचित याच्या गोलंदाजीवर जोनाथन याने स्लिपमध्ये अप्रतिम झेल पकडल्यामुळे जमलेली जोडी फुटली. रोहन याने १५२ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. दुसऱ्या दिवसअखेर गोव्याने ५ बाद १७७ धावा केल्या होत्या. स्नेहल ५६ धावांवर खेळत आहे. त्याने १२५ चेंडूंतील खेळीत चार चौकार मारले.

दृष्टिक्षेपात...

मोहित रेडकरचे १७ व्या रणजी सामन्यात ५० बळी

कमी सामन्यांत बळींचे अर्धशतक नोंदविणारा गोव्याचा चौथा गोलंदाज

यापूर्वी सौरभ बांदेकर व लक्षय गर्ग यांचे प्रत्येकी १३ सामन्यांत, तर अमित यादवच्या १६ सामन्यांत ५० विकेट

जानेवारी २०२४ मध्ये म्हैसूर येथे कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात ८३ धावा केल्यानंतर सलग नऊ डाव स्नेहल कवठणकर अर्धशतकाविना

सलामीचा रोहन कदम याचे गोव्यातर्फे सलग दुसरे अर्धशतक

Ranji Trophy 2024: गोव्याचा अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकर याला महत्त्वाच्या क्षणी सूर गवसला. त्याने नऊ डावानंतर अर्धशतकी खेळी करताना सलामीचा रोहन कदम याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
Goa Sports: केंद्रीय जलतरण स्पर्धेत गोव्याची यशस्वी कामगिरी! सक्षम, धिमनला रौप्यपदके

नो-बॉलचे शुक्लकाष्ठ!

गोव्याची फिरकी गोलंदाज मोहित रेडकर याने रविवारी सकाळच्या सत्रात दोघांना बाद केले, पण तिसऱ्या पंचाने पडताळणीनंतर दोन्ही वेळेस नो-बॉल जाहीर केल्याने नागालँडला सावरता आले, त्यांची पिछाडीही कमी झाली. त्यांची स्थिती ७ बाद ९४ अशी असताना मोहितने नागाहो चिशी याला त्रिफळाचीत बाद केले, पण नोबॉलमुळे नागाहो टिकला. नंतर नागालँडची ८ बाद १२५ अशी स्थिती असताना मोहितच्या गोलंदाजीवर मंथन खुटकरने झेल पकडला, यावेळही तिसऱ्या पंचाने नो-बॉल जाहीर केला. तेव्हा १५ धावांवर असलेल्या जे. सुचितने वैयक्तिक १५ वरून नाबाद ३५ धावा करताना संघाची धावसंख्या १४७ पर्यंत नेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com