Goa Sports News
पणजी: देशभरातील केंद्रीय विद्यालय पातळीवरील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कांपाल येथील खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रातील जलतरण प्रशिक्षणार्थी सक्षम नाईक व धिमन कश्यप यांनी पदके जिंकली. स्पर्धा नवी दिल्ली येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जलतरण प्रकल्प संकुलात झाली.
कवळे येथील सक्षम याने १०० मीटर बटरफ्लाय आणि २०० मीटर वैयक्तिक मेडली प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. सक्षम १४ वर्षांखालील वयोगटात सहभागी झाला होता. तो बेती येथील आयएनएस मांडवी केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कांपाल येथील खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रातील जलतरण प्रशिक्षक टी. सुजित यांचे मार्गदर्शन लाभले.
सक्षम राज्यस्तरीय विजेता असून सलग दोन वर्षे (२०२३ व २०२४) राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अनुक्रमे गट दोन व तीनमध्ये सर्वोत्तम जलतरणपटूचा करंडक पटकावला. राजकोट व भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत त्याने गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.