Ranji Trophy 2025 : गोवा संघाशी भिडणार IPLचा शतकवीर; पर्वरीत रंगणार सामना; रणजी सामन्यात चंदीगडचे आव्हान

Goa Vs Chandigarh Cricket : दोन्ही संघांतील एलिट ब विभागीय चार दिवसीय सामना १५ ऑक्टोबरपासून पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर खेळला जाईल, त्यानिमित्त पाहुणा संघ रविवारी दाखल झाला.
Goa Cricket Team
Goa Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अनुभवी फलंदाज मनन वोहरा सलग तिसऱ्यांदा गोव्याविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंडीगडचे नेतृत्व करेल. दोन्ही संघांतील एलिट ब विभागीय चार दिवसीय सामना १५ ऑक्टोबरपासून पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर खेळला जाईल, त्यानिमित्त पाहुणा संघ रविवारी दाखल झाला.

यापूर्वी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोवा व चंडीगड यांच्यात दोन सामने झालेले आहेत. दोन्ही वेळेस अगोदर पंजाबकडून खेळणाऱ्या, तसेच आयपीएल स्पर्धेतही झळकलेल्या मनन याने चंडीगडचे नेतृत्व केले होते. आता २०२५-२६ मोसमातील पहिल्या सामन्यासाठी जाहीर केलेल्या संघाचाही हा ३२ वर्षीय फलंदाज कर्णधार आहे. २० वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज निशुंक बिर्ला पाहुण्या संघातील सर्वांत युवा सदस्य आहे. संघ सोमवारी सराव करणार आहे.

यापूर्वी चंडीगडचे गोव्याविरुद्धचे दोन्ही सामने पर्वरी येथे झाले होते व दोन्ही वेळेस अनिर्णित निकाल लागला होता. गोवा व चंडीगड यांच्यातील पहिला रणजी करंडक सामना प्लेट विभागात १९ ते २२ जानेवारी २०२० या कालावधीत खेळला गेला, नंतर १२ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत एलिट गटात सामना झाला होता.पर्वरी १५ पासून खेळला जाणारा सामना गोवा, तसेच चंडीगडचा यंदाच्या मोहिमेतील पहिला आहे.

Goa Cricket Team
Senior T20 Cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

चंडीगडचा संघ

मनन वोहरा (कर्णधार), राज बावा, भागमेंदर लाथेर, अभिषेक सैनी, अर्जुन आझाद, शिवम भांब्री, रमण बिष्णोई, जगजीत सिंग, विष्णू कश्यप, अंकित कौशिक, कुणाल महाजन, मोहित सोनी, निखिल ठाकूर, निशुंक बिर्ला, मयंक सिद्धू.

Goa Cricket Team
Cricketer Threat: 5 कोटी दे...टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला अंडरवर्ल्डकडून धमक्या, दाऊद टोळीचं नाव समोर

गोवा संघाच्या उंबरठ्यावर अभिनव

चंडीगडविरुद्धच्या सामन्यासाठी गोव्याचा संघ सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. डॉ. (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती स्पर्धेत चमकदार फलंदाजी केलेला अभिनव तेजराणा गोव्याच्या संघातील नवा चेहरा ठरू शकतो. त्याने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या स्पर्धेतील चार सामन्यांत ३२९ धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com