Jijabai Karandak: गोव्याच्या महिला संघाचा सलग 3 रा पराभव! तमिळनाडूविरुद्ध हाराकिरी; स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

Goa Vs Tamilnadu: अ गटातील अखेरच्या साखळी लढतीत त्यांना तमिळनाडूने ५-० फरकाने सहज पराभूत केले. सामना मंगळवारी छत्तीसगडमधील नारायणपूर येथे झाला.
Rajmata Jijabai Karandak
Rajmata Jijabai KarandakDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजमाता जिजाबाई करंडक ३०व्या राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेत दारुण पराभवासह गोव्याचे आव्हान संपुष्टात आले. अ गटातील अखेरच्या साखळी लढतीत त्यांना तमिळनाडूने ५-० फरकाने सहज पराभूत केले. सामना मंगळवारी छत्तीसगडमधील नारायणपूर येथे झाला.

पश्चिम बंगालला पहिल्या लढतीत गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर गोव्याच्या महिलांचा हा सलग तिसरा पराभव ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांना अनुक्रमे छत्तीसगड व ओडिशाने नमविले होते. चार लढतीत तीन पराभव, एक बरोबरी व फक्त एक गुण अशी गोव्याची कामगिरी ठरली. त्यांनी स्पर्धेच्या मुख्य फेरीत फक्त तीन गोल नोंदविले, तर ११ गोल स्वीकारले.

गोव्याविरुद्ध तमिळनाडूसाठी प्रियदर्शिनी हिने हॅटट्रिक साधली. पूर्वार्धात बदली खेळाडू या नात्याने मैदानात आलेल्या प्रियदर्शिनी हिने अनुक्रमे ३९, ५३ व ७०व्या मिनिटास गोल केला. तीच सामन्याची मानकरी ठरली. याशिवाय विनोदिनी हिने ५९व्या, तर आणखी एक बदली खेळाडू शॅरोन हिने ७३व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

Rajmata Jijabai Karandak
New Coach of Indian Football Team: भारतीय फुटबॉल संघाला 13 वर्षांनंतर मिळाला 'Indian Coach', 'या' माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी

अ गटातील अन्य एका लढतीत मंगळवारी ओडिशाने छत्तीसगडला ३-० असे नमवून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. ओडिशाचे सहा गुण झाले असून छत्तीसगडचे तीन गुण कायम राहिले. पश्चिम बंगालचे सात, तर तमिळनाडूचे सहा गुण झाले आहेत.

Rajmata Jijabai Karandak
I League Football: धेंपो क्लबच्या ‘सुपर सब’ची कमाल! दिल्ली एफसीविरोधात नोंदवला शानदार विजय; नेस्टरचा गोल ठरला निर्णायक

गोवा वगळता बाकी संघांचा अखेरचा साखळीसामना बाकी आहे. त्यानंतर उपांत्य फेरीतील संघ निश्चित होईल. पश्चिम बंगाल, ओडिशा व तमिळनाडू यांच्यात चुरस आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com