Professional League: स्पोर्टिंग क्लबकडून 'गार्डियन एंजल्स'चा धुव्वा! 8-2 फरकाने दणदणीत विजय; 'विक्रम'ची शानदार हॅटट्रिक

Sporting Club Vs Guardian Angel Sports Club: एका गोलच्या पिछा़डीवरून स्पोर्टिंग क्लबच्या एकतर्फी विजयात बदली खेळाडू विक्रम व्यंकटचलम याने शानदार हॅटट्रिक साधली.
Sporting Club Vs Guardian Angel Sports Club
Professional League Sporting Club GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Professional League Sporting Club Vs Guardian Angel Sports Club

पणजी: गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान आणखीनच भक्कम करताना गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबवर ८-२ फरकाने दणदणीत विजय नोंदविला. सामना मंगळवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

एका गोलच्या पिछा़डीवरून स्पोर्टिंग क्लबच्या एकतर्फी विजयात बदली खेळाडू विक्रम व्यंकटचलम याने शानदार हॅटट्रिक साधली. त्याने अनुक्रमे ७६, ८२ व ८७व्या मिनिटास अचूक नेमबाजी केली. याशिवाय डॉयल अल्वेस याने ३६ व ६४व्या मिनिटास मिळून दोन, शिवाय लेरन डायस याने १५व्या, फ्रान्सिस फर्नांडिसने ५३व्या व सुशील मेतेई याने ६७व्या मिनिटास प्रत्येकी गोल केला. गार्डियन एंजल क्लबसाठी पीटर कार्व्हालो याने १४व्या, तर ऐरेन फर्नांडिस याने ६१व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

Sporting Club Vs Guardian Angel Sports Club
ISL 2024-25: FC Goa ने पुन्हा साधली बरोबरी; सलग 10 सामने अपराजित घोडदौड, गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप

गार्डियन एंजल क्लबचा लिव्हन क्लेमेंत याला ६३व्या मिनिटास रेड कार्ड मिळाले, त्यामुळे सामन्यातील बाकी कालावधीत त्यांना दहा खेळाडूंसह खेळावे लागले. विश्रांतीला स्पोर्टिंग क्लब संघ २-१ फरकाने आघाडीवर होता.

Sporting Club Vs Guardian Angel Sports Club
FC Goa: 'स्पर्धेच्या सामन्यांतील अखेरची काही मिनिटे धक्कादायक..'; प्रशिक्षक मार्केझनी केले मनसुबे व्यक्त

स्पर्धेतील अपराजित असलेल्या आर्मांद कुलासो यांच्या मार्गदर्शनाखालील स्पोर्टिंग क्लब द गोवाचा हा दहावा विजय ठरला. त्यांचे ११ सामन्यांतून ३१ गुण झाले असून सहा गुणांच्या आघाडीसह ते अग्रस्थानी आहेत. गार्डियन एंजल क्लबचा हा आठवा पराभव ठरला. त्यामुळे ११ सामन्यांतून पाच गुणांसह ते बाराव्या क्रमांकावर कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com