ISL 2024-25: FC Goa ने पुन्हा साधली बरोबरी; सलग 10 सामने अपराजित घोडदौड, गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप

FC Goa Vs Northeast United: मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाने २७ गुणांसह गुणतक्त्यात आता दुसरा क्रमांक पटकावला आहे.
FC Goa Vs Northeast United
FC Goa Football Match Dainik Gomantak
Published on
Updated on

ISL 2024-25 FC Goa Vs Northeast United

पणजी: एफसी गोवाने आघाडी घेतल्यानंतर पुन्हा एकदा गोल स्वीकारला आणि इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत त्यांना सलग दुसऱ्या सामन्यात १-१ गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले. गुवाहाटी येथे मंगळवारी रात्री नॉर्थईस्ट युनायटेडने त्यांच्याविरुद्ध प्रत्येकी एक गुण विभागून घेतला.

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाने २७ गुणांसह गुणतक्त्यात आता दुसरा क्रमांक पटकावला आहे. बंगळूर एफसीचे २७ गुण आहेत, पण गोव्यातील संघाची गोलसरासरी सरस आहे. अव्वल क्रमांकावरील मोहन बागानचे ३५ गुण आहेत. नॉर्थईस्ट युनायटेडचे २४ गुण झाले असून ते पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांना सलग तिसऱ्या लढतीत बरोबरीचा एक गुण मिळाला.

सामन्यातील दोन्ही गोल उत्तरार्धातील खेळात झाले. महंमद यासीर याने ६५व्या मिनिटास एफसी गोवास आघाडी मिळवून देताना ब्रायसन फर्नांडिसच्या असिस्टवर नॉर्थईस्ट युनायटेडचा बचाव भेदला. नंतर ७६व्या मिनिटास एफसी गोवाच्या बचावफळीची एकाग्रता ढळली आणि एम. एस. जितिन याने संधीचा पूरेपूर फायदा उठवत यजमान संघाला बरोबरी साधून दिली. हा गोल अलाएद्दीन अजारेई याच्या असिस्टवर झाला. हा एक अपवाद वगळता नॉर्थईस्ट युनायटेडची आक्रमण एफसी गोवाच्या दक्ष बचावासमोर यशस्वी ठरली नाहीत.

FC Goa Vs Northeast United
FC Goa: 'एफसी गोवा'समोर बंगळूरचा कठीण पेपर; यजमानांविरुद्ध सातत्य राखण्याचे आव्हान

एफसी गोवाला मागील लढतीत भरपाई वेळेतील गोलमुळे हैदराबाद एफसीने गोलबरोबरीत रोखले होते. मंगळवारीही त्याचीच पुनरावृत्ती झाली आणि गुवाहाटी येथे एफसी गोवास विजय हुकला.

FC Goa Vs Northeast United
FC Goa: 'स्पर्धेच्या सामन्यांतील अखेरची काही मिनिटे धक्कादायक..'; प्रशिक्षक मार्केझनी केले मनसुबे व्यक्त

अपराजित मालिका अखंडित

एफसी गोवाची यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील अपराजित मालिका अखंडित राहिली. आता ते सलग १० सामने अपराजित असून यामध्ये सहा विजय व चार बरोबरींची समावेश आहे. एकंदरीत १५ सामन्यांत एफसी गोवाने सात विजय, सहा बरोबरी व दोन पराभव अशी कामगिरी केली आहे. एफसी गोवा संघ आयएसएल मोसमात अवे मैदानावर सलग आठ सामने अपराजित आहे, यामध्ये त्यांनी चार विजय व चार बरोबरींची नोंद केली आहे. एफसी गोवा व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात आतापर्यंत २२ आयएसएल सामने झाले असून त्यात १२ सामने बरोबरीत राहिले आहेत. एफसी गोवाने सहा, तर नॉर्थईस्टने चार सामन्यांत विजय मिळविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com