FC Goa: 'स्पर्धेच्या सामन्यांतील अखेरची काही मिनिटे धक्कादायक..'; प्रशिक्षक मार्केझनी केले मनसुबे व्यक्त

ISL 2024-25: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या प्ले-ऑफ फेरीत जागा मिळविण्यासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे.
Manolo Marquez
Manolo MarquezDainik Gomantak
Published on
Updated on

ISL FC Goa Vs Northeast United

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या प्ले-ऑफ फेरीत जागा मिळविण्यासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सलग नऊ सामने अपराजित असलेल्या एफसी गोवाची लढत मंगळवारी (ता. १४) गुवाहाटी येथे धोकादायक नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल.

एफसी गोवा संघ अवे मैदानावरही सलग सात सामने अपराजित आहे. या विषयी सामन्यासाठी गुवाहाटीत रवाना होण्यापूर्वी एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘स्पर्धेत शेवटपर्यंत अपराजित राहणे आम्हाला नक्कीच आवडेल, पण ती सोपी गोष्ट नाही. स्पर्धेत प्रचंड चुरस आहे. आम्हाला परिपक्व खेळ कायम राखावा लागेल. सध्या स्पर्धेतील सामन्यांतील अखेरची काही मिनिटे धक्कादायक ठरत आहेत.’’

सध्या एफसी गोवाचे १४ सामन्यांतून २६ गुण असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. मागील लढतीत हैदराबाद एफसीविरुद्ध भरपाई वेळेत गोल स्वीकारल्यामुळे एफसी गोवाला बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. त्या लढतीत आपल्या संघाने चांगला खेळ केला नसल्याचे मार्केझ यांनी यापूर्वीच मान्य केलेले आहे. मागील सामन्यात निलंबित असलेला ओडेई ओनाइंडिया संघात परतणार असल्याने एफसी गोवाची बचावफळी आणखीनच भक्कम होईल, मात्र हैदराबादविरुद्ध रेड कार्ड मिळालेला मध्यरक्षक बोर्हा हेर्रेरा मंगळवारच्या सामन्यास मुकेल.

नॉर्थईस्ट युनायटेडचे १५ सामन्यांतून २३ गुण आहेत. मागील लढतीत पंजाब एफसीविरुद्ध आणि त्यापूर्वी मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागल्यामुळे नॉर्थईस्ट युनायटेडला महत्त्वाच्या चार गुणांना मुकावे लागले. त्यातच त्यांचे मुख्य प्रशिक्षक हुआन बेनाली यांना पंजाबविरुद्ध भरपाई वेळेत रेड कार्ड मिळाले, त्यामुळे ते उद्या मैदानावर संघाच्या डगआऊटमध्ये नसतील.

Manolo Marquez
ISL 2024-25: "प्रशिक्षक या नात्याने खेळाडूंच्या निवडीत मी चुकीचा ठरलो", एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी व्यक्त केली खंत

एफसी गोवा स्पर्धेत सध्या सलग नऊ सामने अपराजित आहे. यामध्ये सहा विजय व तीन बरोबरींचा समावेश आहे. स्पर्धेत ते २४ पासून अपराजित आहेत. त्याचवेळी यंदा स्पर्धेत अवे मैदानावर मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सात सामन्यांत एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. २१ सप्टेंबरपासून त्यांनी अवे मैदानावर चार विजय व तीन बरोबरींची नोंद केली आहे.

Manolo Marquez
FC Goa: 'पहिल्या मिनिटापासून एकाग्रतेने खेळावे लागेल अन्यथा...'; हैद्राबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रशिक्षक मार्केझ यांचा इशारा

मैदानात उतरण्यापूर्वी...

एफसी गोवाचे ७ विजय, ५ बरोबरी, २ पराभव, २६ गुण

नॉर्थईस्ट युनायटेडचे ६ विजय, ५ बरोबरी, ४ पराभव, २३ गुण

एफसी गोवाने २८ गोल केले, १९ गोल स्वीकारले

नॉर्थईस्ट युनायटेडने ३० गोल नोंदविताना २१ गोल स्वीकारले

नॉर्थईस्ट युनायटेडच्या अलाएद्दीन अजारेई याचे स्पर्धेत सर्वाधिक १५ गोल

एफसी गोवाच्या आर्मांदो सादिकू याचे एकूण ९ गोल

आयएसएलमध्ये उभय संघांत २१ सामने, त्यात एफसी गोवाचे ६, तर नॉर्थईस्ट युनायटेडचे ४ विजय, ११ लढतींत बरोबरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com