Goa Ranji Team: गोवा क्रिकेट संघात मोठे बदल! साखळी लढतीत खेळलेल्या सहा जणांना डच्चू; 'या' चौघांचा समावेश

Goa Ranji Cricket Team: रणजी करंडक क्रिकेट प्लेट विभागीय अंतिम लढतीसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सीनियर निवड समितीने संघात मोठे बदल केले.
Goa Cricket
Goa CricketDainik
Published on
Updated on

पणजी: रणजी करंडक क्रिकेट प्लेट विभागीय अंतिम लढतीसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सीनियर निवड समितीने संघात मोठे बदल केले. अरुणाचल प्रदेशविरुद्ध अखेरच्या साखळी लढतीत खेळलेल्या १८ सदस्यीय संघातील सहाजणांना वगळण्यात आले, तर चौघांना आता १६ सदस्यीय संघात सामावून घेण्यात आले आहे.

गोव्याचा पाच दिवसीय रणजी प्लेट अंतिम सामना २३ जानेवारीपासून सोविमा येथे नागालँडविरुद्ध खेळला जाईल. या दोन्ही संघांनी २०२५-२६ मोसमातील रणजी करंडक एलिट श्रेणीसाठी पात्रता मिळविली आहे.

Goa Cricket
GCA: मतभेदाला तिलांजली, क्रिकेटला प्राधान्य! जीसीए आमसभेत ‘सतावणूक’ प्रकरण व्यवस्थापकीय समितीकडे

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी या महत्त्वपूर्ण लढतीसाठी गोव्याचा १६ सदस्यीय संघ निवडण्यात आला. त्यात डावखुरा फिरकीपटू अमूल्य पांड्रेकर, वेगवान गोलंदाज फेलिक्स आलेमाव व विजेश प्रभुदेसाई यांनी पुनरागमन केले, तर अष्टपैलू विकास सिंग रणजी क्रिकेट न खेळलेला नवा चेहरा आहे. या चौघांनीही रणजी प्लेट साखळी फेरीनंतर झालेल्या टी-२० व एकदिवसीय स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती.

Goa Cricket
Ranji Trophy: प्लेट विजेतेपदासाठी गोवा व नागालँड यांच्यात रंगणार लढत! दोन्ही संघ पुढील एलिट विभागासाठी पात्र

अरुणाचल प्रदेशविरुद्ध अखेरच्या साखळी लढतीसाठी निवडलेल्या १८ सदस्यीय संघातील लक्षय गर्ग, कीथ पिंटो, शुभम तारी, राहुल मेहता, मंथन खुटकर व ऋत्विक नाईक या सहाजणांना वगळण्यात आले आहे. यापैकी लक्षय व कीथ अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या अकरा सदस्यीय संघात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com