Vijay Hazare Trophy: अर्जुन तेंडुलकरला धु धु धुतलं! मुंबईच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजीचा घेतला समाचार; सर्फराज-यशस्वीची धमाकेदार फलंदाजी VIDEO

Arjun Tendulkar Poor Bowling: मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 444 धावांचा विशाल स्कोअर उभा केला.
Arjun Tendulkar Poor Bowling
Arjun Tendulkar Poor BowlingDainik Gomantak
Published on
Updated on

Arjun Tendulkar Poor Bowling: विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत बुधवारी (31 डिसेंबर) मुंबई आणि गोवा या दोन शेजारील राज्यांच्या संघात जयपूर येथे अटीतटीचा सामना रंगला. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. विशेषतः सर्फराज खान आणि यशस्वी जयस्वाल यांच्या फलंदाजीपुढे गोव्याचे गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसले. या सामन्यात सर्वांचे लक्ष गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरकडे होते, मात्र त्याला मुंबईच्या फलंदाजांनी चांगलाच 'प्रसाद' दिला.

444 धावांचा पाऊस

मुंबईने (Mumbai) पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 444 धावांचा विशाल स्कोअर उभा केला. मुंबईच्या या डोंगराएवढ्या धावसंख्येचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे सर्फराज खान. सर्फराजने अवघ्या 75 चेंडूंमध्ये 157 धावांची विस्फोटक खेळी खेळली. त्याने आपले शतक केवळ 53 चेंडूत पूर्ण करुन प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवली. त्याच्या या वादळी खेळीत 9 चौकार आणि तब्बल 14 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याला सलामीवीर यशस्वी जयस्वालने 46 धावांची खेळी खेळून चांगली साथ दिली.

Arjun Tendulkar Poor Bowling
Vijay Hazare Trophy: सलग दुसरे शतक, 14 वेळा चेंडू सीमापार! ललितच्या कारनाम्यामुळे गोव्याची घोडदौड; सिक्कीम पराभूत

अर्जुन तेंडुलकरची निराशाजनक कामगिरी

दुसरीकडे, गोव्याच्या (Goa) संघातून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरसाठी हा सामना एखाद्या स्वप्नवत धक्क्यासारखा ठरला. आपल्या जुन्या मुंबई संघाविरुद्ध खेळताना अर्जुनला छाप पाडता आली नाही. त्याने 8 षटकांच्या गोलंदाजीत तब्बल 78 धावा दिल्या. 9.75 च्या महागड्या इकॉनॉमी रेटने त्याने धावा दिल्या. विशेष म्हणजे यादरम्यान त्याला एकही विकेट्स घेता आली नाही. अर्जुनसाठी ही संपूर्ण स्पर्धा आतापर्यंत निराशाजनक ठरली. सिक्कीम आणि हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यांतही त्याला विकेट मिळवण्यात अपयश आले होते. फलंदाजीमध्येही तो फारशी चमक दाखवू शकलेला नाही. आगामी आयपीएल 2026 मध्ये अर्जुन लखनौ सुपर जायंट्सच्या जर्सीत दिसणार आहे, त्यामुळे त्याच्या या खराब फॉर्मने संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवली.

Arjun Tendulkar Poor Bowling
Vijay Hazare Trophy: स्नेहलच्या शतकामुळे गोव्याचा विजय, छत्तीसगडला सहा विकेट राखून सहज नमविले

गोव्यासमोर हिमालयाएवढे आव्हान

मुंबईने ठेवलेल्या 445 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे गोव्यासाठी अशक्यप्राय वाटत आहे. सर्फराजच्या द्विशतकाच्या जवळ जाणाऱ्या खेळीने गोव्याच्या गोलंदाजीचे कंबरडे आधीच मोडले. आता गोव्याचे फलंदाज या आव्हानाचा सामना कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईच्या फलंदाजांनी जयपूरमध्ये धावांची आतषबाजी करून चाहत्यांचे मनोरंजन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com