VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mohammad Rizwan Injured Video: रिझवान हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात होता, मात्र त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू बॅटला न लागता थेट त्याच्या नाजूक जागी लागला.
Mohammad Rizwan Injured Video
Mohammad Rizwan Dainik Gomantak
Published on
Updated on

Mohammad Rizwan Injured Video: ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेल्या प्रसिद्ध 'बिग बॅश लीग'मध्ये (BBL) 10 जानेवारी रोजी खेळल्या गेलेल्या मेलबर्न डर्बी सामन्यात एक थरारक आणि वेदनादायक घटना पाहायला मिळाली. पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान, जो सध्या मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत आहे, फलंदाजी करत असताना एका भीषण दुर्घटनेचा बळी ठरला. मेलबर्न स्टार्सविरुद्धच्या या सामन्यात रिझवानला एका वेगवान चेंडूचा असा फटका बसला की, तो वेदनेने मैदानातच कोसळला.

नेमकं काय घडलं?

मेलबर्न रेनेगेड्सची टीम पहिल्यांदा फलंदाजी करत असताना रिझवान मैदानात उतरला. डावाच्या 11व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज पीटर सिडल गोलंदाजी करत होता. या षटकातील पाचवा चेंडू पिचवर पडल्यानंतर अतिशय वेगाने आतल्या बाजूला (In-swinger) आला. रिझवान हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात होता, मात्र त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू बॅटला न लागता थेट त्याच्या नाजूक जागी लागला.

Mohammad Rizwan Injured Video
Abhishek Sharma: अभिषेक शर्माचा नवा पराक्रम! बनला एका वर्षात T20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू

चेंडूचा वेग इतका प्रचंड होता की, रिझवानने तात्काळ बॅट सोडून दिली आणि तो गुडघ्यावर बसून वेदनेने विव्हळू लागला. रिझवानला अशा स्थितीत पाहून गोलंदाज पीटर सिडलनेही खेळ थांबवून त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याची विचारपूस केली. काही वेळ मैदानावरच फिजिओकडून उपचार घेतल्यानंतर रिझवान पुन्हा उभा राहिला, मात्र या वेदनादायक फटक्यानंतर तो मोठी खेळी करु शकला नाही. रिझवानने 20 चेंडूत 21 धावा केल्या, ज्यात केवळ 2 चौकारांचा समावेश होता.

मेलबर्न स्टार्सचा एकतर्फी विजय

या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्सचा संघ 20 षटकांत 7 बाद 166 धावाच करु शकला. 167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्सच्या संघाने अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. स्टार्सचा सलामीवीर सॅम हार्पर याने वादळी फलंदाजी करत 51 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी केली. हार्परच्या या शानदार खेळीच्या जोरावर मेलबर्न स्टार्सने केवळ 2 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले आणि 8 गड्यांनी एकतर्फी विजय नोंदवला.

Mohammad Rizwan Injured Video
Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

या विजयानंतर मेलबर्न स्टार्सने पॉइंट्स टेबलमध्ये आपली पकड मजबूत केली. स्टार्सचा संघ आता 8 सामन्यांत 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. दुसरीकडे, पराभूत झालेला मेलबर्न रेनेगेड्सचा संघ 7 सामन्यांत 6 गुणांसह 7व्या क्रमांकावर असून त्यांच्यासाठी स्पर्धेतील पुढील मार्ग कठीण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com