Manish Jadhav
मेलबर्न येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा डाव 18.5 षटकांत केवळ 125 धावांवर आटोपला.
संपूर्ण भारतीय फलंदाजी ढेपाळली असताना, सलामीवीर अभिषेक शर्माने एकहाती किल्ला लढवत केवळ 37 चेंडूंत 68 धावा (8 चौकार, 2 षटकार) फटकावल्या.
आपल्या खेळीदरम्यान दुसरा षटकार मारताच अभिषेक शर्माने पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानचा मोठा विक्रम मोडला.
अभिषेक शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार (43 षटकार) मारणारा फलंदाज बनला.
यापूर्वी, हा विक्रम मोहम्मद रिजवानच्या नावावर होता, त्याने 2021 मध्ये 42 षटकार मारले होते. अभिषेकने हा विक्रम 43 षटकारांसह मोडला.
अभिषेक शर्माने आतापर्यंत 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 936 धावा पूर्ण केल्या आहेत, त्याला 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 64 धावांची गरज आहे.
सर्वात जलद 1000 धावांची संधी
जर अभिषेकने पुढील सामन्यात 64 धावा पूर्ण केल्या, तर तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज बनेल.
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पण केल्यापासून अभिषेकने 6 अर्धशतके आणि 2 शतकांसह सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.