Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Shaheen Afridi ODI captain: अफ्रिदीने मोहम्मद रिजवान याची जागा घेतली आहे. गेल्या वर्षी बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यावर रिजवानने ही जबाबदारी स्वीकारली होती.
Pakistan ODI Captain, Shaheen Afridi ODI captain
Pakistan ODI Captain, Shaheen Afridi ODI captainDainik Gomantak
Published on
Updated on

कराची: पाकिस्तान क्रिकेट संघात मोठा बदल घडलेला आहे. शाहीन अफ्रिदीला पाकिस्तानच्या ODI संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले आहे. डाव्या हाताचा हा वेगवान गोलंदाज अफ्रिदी ४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या तीन-ओव्हरच्या ODI मालिकेत कर्णधार म्हणून दिसणार आहे.

अफ्रिदीने मोहम्मद रिजवान याची जागा घेतली आहे. गेल्या वर्षी बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यावर रिजवानने ही जबाबदारी स्वीकारली होती. अफ्रिदीसाठी पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२४ च्या सुरुवातीस अफ्रिदीला पाकिस्तानच्या T20I संघाचे कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले होते, मात्र त्यांनी केवळ न्यूझीलंडविरुद्धच्या एका मालिकेतच नेतृत्व केले.

त्या पाच सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने फक्त अंतिम सामना जिंकला होता. काही महिन्यांनंतर बाबर आझमला पुन्हा T20I कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले, आणि नंतर गेल्या वर्षी सलमान आघा यांनी संघाचे नेतृत्व केले.

Pakistan ODI Captain, Shaheen Afridi ODI captain
Pakistan Cricket: निवृत्तीच्या वयात पदार्पण! 38 वर्षीय आफ्रिदीची कसोटी क्रिकेटमध्ये एन्ट्री

अफ्रिदीला कर्णधार बनवण्याचा निर्णय व्हाईट-बॉल कोच माइक हेसन, हाय परफॉर्मन्स डिरेक्टर आकिब जावेद आणि निवड समितीच्या सदस्यांच्या बैठकीत घेतला गेला असल्याची बातमी आहे.. दुसरीकडे, रिजवानने कर्णधारपदाची कारकिर्द २० एकदिवसीय सामन्यानंतर संपली. ज्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध २-१ विजय आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध डिसेंबर २०२४ मध्ये ३-० विजयाचा समावेश होता.

Pakistan ODI Captain, Shaheen Afridi ODI captain
Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीतील अपयशी कामगिरीनंतर पाकिस्तानने रिजवानच्या कर्णधारपदावरून हटण्याचा निर्णय घेतला. रिजवानच्या अल्प कर्णधार कारकिर्दीत ९ विजय आणि ११ पराभव नोंदवले गेले. अफ्रिदी पाकिस्तानच्या व्हाईट-बॉल आणि रेड-बॉल संघाचा अविभाज्य भाग राहिला असून, त्याच्या नावावर तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण १९४ आंतरराष्ट्रीय सामने आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com