AUS vs ENG: मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वसीम अक्रमला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये ठरला जगातील नंबर-1 डावखुरा वेगवान गोलंदाज VIDEO

Mitchell Starc Test Wickets Record: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे.
Mitchell Starc Test Wickets Record
Mitchell Starc Dainik Gomantak
Published on
Updated on

Mitchell Starc Test Wickets Record: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण रेकॉर्ड आपल्या नावावर केला. या सामन्यात तीन बळी घेतल्यानंतर स्टार्क आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज बनला. या कामगिरीमुळे त्याने पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रम यालाही मागे सोडले.

वसीम अक्रमच्या विक्रमावर स्टार्कची मोहोर

कसोटी क्रिकेटमध्ये डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम अनेक वर्षांपासून पाकिस्तानचे दिग्गज वसीम अक्रम यांच्या नावावर होता. अक्रमने आपल्या शानदार कारकिर्दीत 414 कसोटी बळी घेतले होते. मात्र, मिचेल स्टार्कने इंग्लंडविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात ही संख्या ओलांडली. स्टार्कने आपल्या कसोटी बळींची संख्या 415 पर्यंत नेली असून तो आता या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला. जगातील एका दिग्गज गोलंदाजाला मागे टाकून स्टार्कने मिळवलेला हा सन्मान त्याच्या मेहनतीचे प्रतीक आहे.

Mitchell Starc Test Wickets Record
AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

दुसऱ्या कसोटीत स्टार्कचा भेदक मारा

इंग्लंडचा (England) कर्णधार बेन स्टोक्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्टार्कच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. मिचेल स्टार्कने इंग्लंडच्या डावाच्या सुरुवातीलाच सलामीवीर बेन डकेट याला बाद केले आणि त्याला आपले खातेही उघडू दिले नाही. त्यानंतर त्याने मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज ओली पोपलाही शून्यावरच तंबूचा रस्ता दाखवला. धोकादायक वाटत असलेल्या हॅरी ब्रूक (31 धावा) यालाही स्टार्कने आपल्या जाळ्यात ओढले आणि तो स्टीव्ह स्मिथकडे झेल देऊन बाद झाला. स्टार्कच्या या तीन बणयांमुळे इंग्लंडची अवस्था नाजूक झाली.

Mitchell Starc Test Wickets Record
AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनीही झुंज दिली. इंग्लंडकडून जॅक क्राउली (76 धावा) आणि माजी कर्णधार जो रुट (68 धावा) यांनी दमदार अर्धशतके झळकावली. जो रुट सध्या कर्णधार बेन स्टोक्ससोबत क्रीजवर उपस्थित आहे.

Mitchell Starc Test Wickets Record
Ashes 2023 Eng vs Aus: स्विंगच्या किंगची बादशाहत! जेम्स अँडरसनने गाठला मोठा टप्पा

मिचेल स्टार्कची तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रभावी कामगिरी

मिचेल स्टार्कने 2011 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात पदार्पण केले होते. सुरुवातीच्या काळात त्याला संघात स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला, पण नंतर त्याने आपल्या सातत्यपूर्ण आणि धमाकेदार कामगिरीमुळे संघात आपले स्थान पक्के केले. त्याने आत्तापर्यंत 102 कसोटी सामन्यांमध्ये 415 बळी घेतले आहेत, जो एक विक्रम आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 247 बळी घेतले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने एकूण 79 बळी घेतले आहेत. कसोटी, वनडे आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रभावी कामगिरी करणारा स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या (Australia) क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी आणि महत्त्वाच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com