Goa Chess Tournament: ‘मनोहर पर्रीकर’ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या ब गटात महाराष्ट्राचा अथर्व ठरला विजेता; गोव्याच्या देवेशनेही दाखवली चमक

Manohar Parrikar Chess Tournament: ‘मनोहर पर्रीकर’ गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘ब’ गटात महाराष्ट्राच्या अथर्व माडकर याने विजेतेपद पटकावले.
Goa Chess Tournament: ‘मनोहर पर्रीकर’ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या ब गटात महाराष्ट्राचा अथर्व ठरला विजेता; गोव्याच्या देवेशनेही दाखवली चमक
Atharv Madkar wins B Group at Manohar Parrikar Chess OpenDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘मनोहर पर्रीकर’ गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘ब’ गटात महाराष्ट्राच्या अथर्व माडकर याने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत गोमंतकीयांनीही चमक दाखविली, त्यात देवेश नाईक राज्यातील खेळाडूंत अव्वल ठरला. स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये मुख्य ‘अ’ गटातील स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेच्या जोडीने ‘ब’ गटातील स्पर्धा घेण्यात आली. गोवा बुद्धिबळ संघटनेने अखिल गोवा बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने स्पर्धा घेतली आहे.

‘ब’ गटात अग्रस्थान मिळवताना अथर्व याने १० फेऱ्यांतून सर्वाधिक साडेआठ गुणांची कमाई केली. तमिळनाडूचा अश्विंत मायकल व गुजरातचा रुद्र पाठक यांचे प्रत्येकी आठ गुण झाले. त्यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. विजेत्याला ७५,००० रुपये, तर उपविजेत्याला ३५,००० रुपये बक्षीस मिळाले.

Goa Chess Tournament: ‘मनोहर पर्रीकर’ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या ब गटात महाराष्ट्राचा अथर्व ठरला विजेता; गोव्याच्या देवेशनेही दाखवली चमक
Manohar Parrikar Scholarship: पर्रीकर स्कॉलर योजनेचे अर्ज संकेतस्थळावर; अधिक माहितीसाठी क्लिक करा

गोव्याच्या देवेश नाईक याने साडेसात गुणांची कमाई केली. त्याला दहावा क्रमांक मिळाला. राज्यातील ११ वर्षांखालील युवा खेळाडू जोशुआ तेलिस याने साडेसात गुणांसह पंधरावा क्रमांक मिळवत बक्षीस विजेत्या खेळाडूंत स्थान मिळविले.

इतर गोमंतकीय खेळाडूंत अनिरुद्ध पार्सेकर, वूमन कँडिडेट मास्टर गुंजल चोपडेकर, आयुष शिरोडकर, दत्ता कांबळी, जॉय काकोडकर यांनी पहिल्या पन्नास खेळाडूंत स्थान मिळविले. एड्रिक वाझ, राजवीर पाटील, एर्विन आल्बुकर्क, शुभ बोरकर, ऋषिकेश परब, आर्यव्रत नाईक देसाई, सुहास अस्नोडकर (व्हेटरन गट) या गोमंतकीय बुद्धिबळपटूंना खास बक्षीस देण्यात आले. वयोगटात सरस पोवार, इव्हान तेलिस, अर्चिता अग्रवाल, अन्विता साठी, स्कायला रॉड्रिग्ज, चैतन्य पाटील, सचित पै, विहान तारी, प्रयांक गावकर, अन्वी देसाई, नव्या नार्वेकर, त्विषा देसाई, वानिया दुकळे, यज्वरी शेट्ये या गोव्यातील खेळाडूंनाही बक्षीस प्राप्त झाले.

बक्षीस वितरण सोहळ्यास गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई, उद्योजक उत्पल पर्रीकर, माजी आमदार नरेश सावळ, गौरीश धोंड, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, खजिनदार विश्वास पिळणकर, सदस्य अमोघ नमशीकर यांची उपस्थिती होती.

Goa Chess Tournament: ‘मनोहर पर्रीकर’ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या ब गटात महाराष्ट्राचा अथर्व ठरला विजेता; गोव्याच्या देवेशनेही दाखवली चमक
Goa Chess Tournament: गोव्याच्या 'अमेय'ची पुन्हा आघाडी; दणदणीत नोंदवला दुसरा विजय

‘‘गोवा (Goa) बुद्धिबळ संघटनेने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजनासाठी केलेल्या उत्कृष्ट प्रयत्नांबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. माझे वडील कै. मनोहर पर्रीकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ही स्पर्धा माझ्या हृदयाच्या कप्प्यात आहे आणि पुढील अनेक वर्षे स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माझ्या पाठिंब्याची खात्री देतो.’’ - उत्पल पर्रीकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com