Goa Chess Tournament: गोव्याच्या 'अमेय'ची पुन्हा आघाडी; दणदणीत नोंदवला दुसरा विजय

Ameya Avadi Wins Second Consecutive Match: ‘मनोहर पर्रीकर’ गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘अ’ गटात गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
Goa Chess Tournament: गोव्याची 'अमेय'ची पुन्हा आघाडी; दणदणीत नोंदवला दुसरा विजय
Ameya Avadi Wins Second Consecutive MatchDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘मनोहर पर्रीकर’ गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘अ’ गटात गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली, तर आयएम ऋत्विज परब याने विजयी पुनरागमन केले. ग्रँडमास्टर अनुराग म्हामल आणि आयएम एथन वाझ यांना पाचव्या फेरीत बरोबरीचा अर्धा गुण प्राप्त झाला.

अमेयचा दणका!

दरम्यान, स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु आहे. स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अमेयने (एलो 2422) गुजरातचा कँडिडेट मास्टर वेदांत वारासाडा (एलो 2154) याला पराजित केले. लागोपाठच्या विजयामुळे त्याचे आता साडेतीन गुण झाले आहेत. ऋत्विजला (एलो 2371) मागील लढतीत पराभव पत्करावा लागला होता.

मंगळवारी त्याने कर्नाटकची (Karnataka) वुमन कँडिडेट मास्टर ए. चार्वी (एलो 2087) हिला नमवून गुणसंख्या साडेतीनवर नेली. ग्रँडमास्टर अनुराग (एलो 2499) याला सलग तीन विजयानंतर मंगळवारी बरोबरीवर समाधान मानावे लागले. काळ्या मोहऱ्यांसह खेळताना त्याला तेलंगणाचा फिडे मास्टर अर्जुन अदिरेड्डी (एलो 2327) याने बरोबरीत रोखले. अनुरागचे आता साडेतीन गुण झाले आहेत.

Goa Chess Tournament: गोव्याची 'अमेय'ची पुन्हा आघाडी; दणदणीत नोंदवला दुसरा विजय
Goa Chess Tournament: गोव्याच्या एथन, अमेयचा ‘ग्रँडमास्टर’ना दे धक्का; चलाख खेळीने दिली मात

एथनचा जलवा

स्पर्धेत सलग पाच डाव अपराजित असलेला एथन (एलो 2412) याने चौथ्या बोर्डवर बलाढ्य प्रतिस्पर्धी रेल्वे क्रीडा मंडळाचा आयएम अरोण्यक घोष (एलो 2544) याला बरोबरीचा प्रस्ताव मान्य करण्यास भाग पाडले. एथनचे आता तीन विजय व दोन बरोबरींसह चार गुण झाले आहेत.

Goa Chess Tournament: गोव्याची 'अमेय'ची पुन्हा आघाडी; दणदणीत नोंदवला दुसरा विजय
Goa Chess Tournament: अपराजित मंदार लाडने पटकावले विजेतेपद! खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत नोंदवली शानदार कामगिरी

संयुक्तरित्या अग्रस्थानी

स्पर्धेत सर्व पाचही डाव जिंकून किर्गिझस्तानचा आयएम सेमेतेई तोलोगन व रशियन आयएम अलेक्झांडर स्लिझेव्हेस्की प्रत्येकी पाच गुणांसह संयुक्त अग्रस्थानी आहेत. अलेक्झांडर याने भारतीय ग्रँडमास्टर एस. पी. सेतूरमण याच्यावर, तर सेमेतेई याने आयएम एस. नितीन याच्यावर मात करून सलग पाचवा डाव जिंकण्याचा पराक्रम साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com