

मुंबई : मुंबईमध्ये रविवारी लियोनेल मेस्सीचा महिमा दिसून आला. तब्बल १४ वर्षांनंतर अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू भारतात आला अन् समस्त देशवासियांना पुन्हा एकदा ‘मेस्सीमय’ केले. कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नसताना मुंबईतील वानखेडे स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले दिसले. निमित्त होते लियोनेल मेस्सीच्या उपस्थितीचे. याप्रसंगी संपूर्ण स्टेडियममध्ये लियोनेल मेस्सीच्या नावाचा ‘जयघोष’ होत होता.
लियोनेल मेस्सीचा वानखेडे स्टेडियमवर प्रवेश... किक मारुन प्रेक्षकांमध्ये भिरकावलेला फुटबॉल... लहान मुलामुलींसोबत दाखवलेली पदलालित्याची जादू... या सर्व बाबी अविस्मरणीय... क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सी यांना एकाच व्यासपिठावर बघण्याचे सौभाग्य याप्रसंगी मुंबईकरांना लाभले.
सचिन तेंडुलकर याने मेस्सीचे कौतुक करताना म्हटले की, मुंबई हे स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाते. वानखेडे स्टेडियममध्ये अनेक स्वप्न पूर्ण झालेली मी बघितलेली आहेत. संस्मरणीय क्षणांचा आनंद मला घेता आला आहे. आता लियोनेल मेस्सी, रॉड्रिगो दी पॉल व लुईस सुआरेझ या तीन महान खेळाडूंचे तुमच्याकडून अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. मुंबई व भारतासाठी हे सोनेरी दिवस ठरला आहे.
कलात्मक कार्यक्रमाने सुरवात
सेलिब्रिटींचा सामना (सुनील छेत्री, दिनो मोर्याचा समावेश)
देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर, प्रफुल्ल पटेल, अजय देवगण, टायगर श्रॉफ या मान्यवरांची उपस्थिती
लियोनेल मेस्सीसह रॉड्रिगो दी पॉल, लुईस सुआरेझ यांची वानखेडेला फेरी
युवा खेळाडूंना घडवण्याच्या प्रोजेक्टचा श्रीगणेशा
१० नंबरची जर्सी भेट : लियोनेल मेस्सी याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री यांना आपली दहा नंबरची जर्सी भेट म्हणून दिली. सचिन तेंडुलकर याने लियोनेल मेस्सी याला आपल्या नावाची दहा नंबरची जर्सी भेट म्हणून प्रदान केली. लियोनेल मेस्सी याने सचिन तेंडुलकरला फुटबॉल भेट म्हणून दिला. देवेंद्र फडणवीसांकडून लियोनेल मेस्सीला स्मृतीचिन्हही भेट देण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.