Manish Jadhav
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटीत 5 विकेट्सने पराभव पत्करला असला तरी ऋषभ पंतचा दबदबा कायम आहे. त्याने कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावले.
दरम्यान, आयसीसीने कसोटी क्रमवारीही जाहीर केली. पंतने यामध्येही झेप घेतली. विशेष म्हणजे या वर्षीच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतने जे काम केले आहे, ते एमएस धोनीही करु शकला नाही.
इंग्लंडविरुद्ध लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात पंतने शानदार शतके ठोकली. अशी कामगिरी करणारा पंत हा भारताचा सातवा फलंदाज ठरला.
या दोन शतकांच्या मदतीने पंतने आयसीसी रँकिंगमध्येही आपला ठसा उमटवला. या सामन्यापूर्वी ऋषभ आयसीसी कसोटी क्रमवारीत आठव्या क्रमांकावर होता, तिथून तो आता सातव्या क्रमांकावर पोहोचला.
या सामन्यापूर्वी ऋषभचे रेटिंग 739 होते, जे आता 800 पर्यंत पोहोचले आहे. उर्वरित चार कसोटी सामन्यांमध्ये पंत आणखी काही मोठ्या खेळी खेळण्याची शक्यता आहे, याचा त्याला आणखी फायदा होईल.
आयसीसी कसोटी क्रमवारीत 800 रेटिंग मिळवणारा ऋषभ हा पहिला भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ठरला.
याआधी कोणताही भारतीय यष्टिरक्षक अशी कामगिरी करु शकला नाही. एमएस धोनीनेही त्याच्या कसोटी कारकिर्दीत कधीही 800 रेटिंग मिळवले नाहीत.