
ICC Test Rankings Update: आयसीसीने पुन्हा एकदा नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीतही बरेच बदल दिसून येत आहेत. भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला एका अंकाचा फायदा झाला. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेडने देखील क्रमवारीत मोठी झेप घेतली. त्याने टॉप 10मध्ये आपले स्थान निश्चित केले. तर पाकिस्तानचा सौद शकील टॉप 10 फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला.
दरम्यान, इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग गुण 889 एवढे आहेत. त्याच्यानंतर इंग्लंडचा हॅरी ब्रूक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग गुण 874 एवढे आहेत. न्यूझीलंडचा केन विल्यमसन (Kane Williamson) सध्या 867 रेटिंगसह आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताचा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या 851 रेटिंगसह आयसीसी कसोटी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथ 816 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर कायम आहे. दरम्यान, ऋषभ पंत (Rishabh Pant) आता 7 व्या क्रमांकावरुन 6 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग गुण 801 एवढे आहे.
टेंबा बाबुमाने दुखापतीमुळे झिम्बाब्वेविरुद्धची मालिका खेळू शकत नाही. त्यामुळे त्याचे रेटिंग आता 798 पर्यंत घसरले आहे. इंग्लंडचा बेन डकेट 787 रेटिंगसह अजूनही 8व्या क्रमांकावर आहे, तर श्रीलंकेचा कामेंदु मेंडिस 781 रेटिंगसह 9व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, ट्रॅव्हिस हेडने एकाच वेळी तीन अंकाची झेप घेतली आहे. तो आता 10व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 756 आहे. ट्रॅव्हिस हेडच्या झेपमुळे पाकिस्तानचा सौद शकील जो आधी 10व्या क्रमांकावर होता, तो आता 11व्या स्थानी पोहोचला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.