Indian Super League: गुवाहाटी येथे बरोबरीची कोंडी फुटणार? सलग दोन विजयांनंतर एफसी गोवासमोर यजमान नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान

ISL Match FC Goa vs NorthEast United: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील डझनभर सामने बरोबरीत राहिले आहेत.
ISL match today Goa vs NorthEast United
ISL match today Goa vs NorthEast UnitedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील डझनभर सामने बरोबरीत राहिले आहेत, तर गुवाहाटीतील मागील दोन लढतीत उभय संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २४) आसाममधील प्रमुख शहरात होणाऱ्या लढतीत कोंडी फुटणार का याची उत्सुकता आहे.

सुपर कप विजेत्या एफसी गोवा संघाने अनुक्रमे ओडिशा एफसी (३-१) व मुंबई सिटी (२-०) संघांविरुद्ध विजयाची नोंद करताना मोसमातील सुधारित खेळाचे प्रदर्शन केले होते. दुसरीकडे ड्युरँड कप विजेत्या नॉर्थईस्ट युनायटेडला सूर गवसलेला नाही.

ISL match today Goa vs NorthEast United
Goa Fishing Industry: मच्छीमारी व्यवसाय संकटात! परप्रांतीय ट्रॉलर्सचा धुडगूस सुरूच; कारवाईत हवे सातत्‍य

मागील चार लढतीतून नॉर्थईस्ट युनाटेडला फक्त एक गुण मिळाला असून तीन पराभव पत्करावे लागले आहेत. मागील लढतीत गेल्या रविवारी गुवाहाटी येथे भर पावसात व मैदानावर भरपूर पाणी साचलेले असताना खेळ झाला आणि त्यात मोहन बागानने नॉर्थईस्ट युनायटेडवर एका गोलने निसटता विजय मिळविला होता.

ISL match today Goa vs NorthEast United
Goa Malaria Cases: मलेरियावर यशस्वी मात! गेल्या 9 वर्षात एकाचाही मृत्यू नाही, दरमहा सरासरी 93 रुग्ण तरीही नियंत्रण कायम!

एकंदरीत सध्याची कामगिरी लक्षात घेता शुक्रवारी एफसी गोवाचे पारडे वरचढ संभवते, पण या संघाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ आकडेवारीला महत्त्व देण्यास तयार नसून ते नॉर्थईस्टलाही कमी लेखत नाहीत.

गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील दोन्ही सामने गोलबरोबरीत राहिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com