IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

Kartik Sharma And Prashant Veer: इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात अनेक धक्कादायक आणि ऐतिहासिक घडामोडी पाहायला मिळाल्या.
Kartik Sharma  and  Prashant Veer
Kartik Sharma and Prashant Veer
Published on
Updated on

IPL Mini Auction 2026: इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात अनेक धक्कादायक आणि ऐतिहासिक घडामोडी पाहायला मिळाल्या. जिथे एकीकडे बड्या स्टार खेळाडूंची चर्चा सुरु होती, तिथे दुसरीकडे भारतीय 'अनकॅप्ड' (ज्यांनी अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही) खेळाडूंनी लिलावाचे सर्व विक्रम मोडीत काढले. कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर या दोन युवा खेळाडूंनी आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. चेन्नई सुपर किंग्सने या दोघांसाठी आपली तिजोरी रिकामी केली.

कार्तिक शर्मा: 19 वर्षांचा विकेटकीपर आता 14.20 कोटींचा मालक

राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा 19 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज कार्तिक शर्मा याच्यासाठी लिलावात फ्रँचायझींमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. कार्तिकचे नाव पुकारले जाताच चेन्नई सुपर किंग्ससह मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी बोली लावायला सुरुवात केली.

कार्तिकची आक्रमक फलंदाजी आणि यष्टीरक्षणातील चपळता लक्षात घेता चेन्नईने त्याला कोणत्याही परिस्थितीत संघात घेण्याचे ठरवले होते. अखेर 14 कोटी 20 लाख रुपयांच्या विक्रमी बोलीवर चेन्नईने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. कार्तिक आता आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.

Kartik Sharma  and  Prashant Veer
IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

प्रशांत वीर: रवींद्र जडेजाचा उत्तराधिकारी?

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) दुसरा मोठा डाव उत्तर प्रदेशच्या प्रशांत वीर याच्यावर लावला. 28.40 कोटींपैकी निम्मे म्हणजेच 14 कोटी 20 लाख रुपये चेन्नईने प्रशांत वीरसाठी मोजले. रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये गेल्यानंतर चेन्नईला एका सक्षम स्पिन ऑलराउंडरची गरज होती. प्रशांत वीर हा जडेजाची उणीव भरुन काढू शकतो, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला आहे.

प्रशांत वीरने युपी टी20 लीगमध्ये आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, त्याने 9 टी20 सामन्यांत 28च्या सरासरीने 112 धावा केल्या असून गोलंदाजीमध्ये 16.66 च्या प्रभावी सरासरीने 12 बळी घेतले आहेत. प्रशांत आणि कार्तिक हे दोघेही आता संयुक्तपणे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू बनले.

Kartik Sharma  and  Prashant Veer
IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

आवेश खानचा जुना विक्रम मोडीत

यापूर्वी, आयपीएलमधील (IPL) सर्वात महागडा अनकॅप्ड भारतीय खेळाडू होण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज आवेश खान याच्या नावावर होता. 20222 च्या लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 10 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, कार्तिक आणि प्रशांत यांनी 14.20 कोटींची बोली मिळवत हा विक्रम इतिहासजमा केला.

वेस्ट इंडिजचा 'स्पिन मास्टर' अकील हुसेनही चेन्नईत

केवळ भारतीयच नव्हे, तर चेन्नईने परदेशी फिरकीपटूवरही मोठी बोली लावली. वेस्ट इंडिजचा अनुभवी फिरकीपटू अकील हुसेन यालाही चेन्नईने आपल्या संघात स्थान दिले. फिरकीला साथ देणाऱ्या चेपॉकच्या मैदानावर अकील हुसेन, प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा ही त्रयी प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरु शकते.

Kartik Sharma  and  Prashant Veer
IND vs SA 3rd T20: दुसऱ्या सामन्यातील पराभव विसरून टीम इंडिया कमबॅक करणार? गिल, सूर्यकुमारच्या फॉर्मकडे लक्ष

सीएसकेची रणनीती: भविष्याचा विचार

या लिलावात चेन्नईने आतापर्यंत महत्त्वाच्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले आहे. अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंना वाव देण्याची 'माही' स्टाईल रणनीती यावेळीही दिसून आली. लिलावाच्या पुढील सत्रात चेन्नई आणखी काही बड्या नावांवर बोली लावण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com