IND vs SA 3rd T20: दुसऱ्या सामन्यातील पराभव विसरून टीम इंडिया कमबॅक करणार? गिल, सूर्यकुमारच्या फॉर्मकडे लक्ष

IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये उद्या धरमशाला येथे तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. ही मालिका भारतीय क्रिकेट संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
IND vs SA 3rd T20
IND vs SA 3rd T20Dainik Gomantak
Published on
Updated on

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये उद्या धरमशाला येथे तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. ही मालिका भारतीय क्रिकेट संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारतामध्ये पुढल्या वर्षी (२०२६) टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या मालिकेकडे सराव म्हणून बघितले जात आहे. याप्रसंगी भारतीय संघातील खेळाडूंसाठीही ही मालिका ‘करो या मरो’ अशीच असणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव व उपकर्णधार शुभमन गिल यांचा सुमार फॉर्म याकडे विशेष लक्ष असेल.

शुभमन गिल याच्या बॅटमधून टी-२० सामन्यांमध्ये धावाच निघालेल्या नाहीत. त्यानंतरही भारतीय संघातील त्याचे स्थान कायम आहे. संजू सॅमसन याला वगळून त्याला संघात स्थान दिले जात आहे. आता दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध तीन टी-२० सामने बाकी आहेत. या तीन सामन्यांमध्ये त्याचा कस लागणार आहे. या तीनही लढती त्याच्यासाठी अटीतटीच्या असणार आहे. या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून धावा व्हायला हव्यात, अन्यथा टी-२० विश्‍वकरंडकासाठीच्या भारतीय संघातील शुभमन गिलचे स्थान धोक्यात असणार आहे.

IND vs SA 3rd T20
Goa Nightclub Fire:नाईट क्लबचा सहमालक अजय गुप्ताला यापूर्वीच दणका, करचुकवेगिरीमुळे मांद्रे पंचायतीने नोव्हेंबरमध्ये बजावली होती नोटीस

टी-२० विश्‍वकरंडकाचे पुढल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांत आयोजन करण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध उर्वरित तीन सामने खेळणार असून, अन्‌ त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध पाच सामने खेळणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी संजू सॅमसन याच्याऐवजी शुभमन गिलला पसंती दिली आहे. आता शुभमन गिलकडून निराशा झाल्यास त्यांनाही टीकेचा सामना करावा लागणार आहे.

IND vs SA 3rd T20
Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या बॅटमधूनही धावा निघालेल्या नाहीत. मागील २० डावांमध्ये त्याला एकही अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. त्याने अखेरची अर्धशतकी खेळी २०२४मधील ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या लढतीत केली होती. त्यानंतरच्या २० डावांमध्ये त्याची सर्वोत्तम खेळी पाकिस्तानविरुद्ध नाबाद ४७ धावांची होय. त्याच्यासाठी पुढील काही दिवस कठोर मेहनतीचे असणार आहेत. कर्णधारपद असल्यामुळे तो भारताच्या टी-२० संघात कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com