IndiGo Flight
IndiGo Flights StatusDainik Gomantak

Indigo Crisis: गोवा-बंगाल सामन्यापूर्वी अम्पायर 'गायब', खेळाडूंनी केला बसनं प्रवास; क्रिकेट वेळापत्रकावर 'हवाई' संकट!

Indigo Crisis Affected Cricket Match: इंडिगोच्या या संकटामुळे कूच बिहार ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या सामन्यांवर थेट परिणाम होत आहे.
Published on

Indigo Crisis Affected Cricket Match: इंडिगो विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आणि फ्लाईट्स वारंवार रद्द होत असल्यामुळे देशभरातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 2 डिसेंबरपासून हे संकट सुरु असून आतापर्यंत सुमारे 5000 फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत. या इंडिगो संकटाचा फटका आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) देशांतर्गत क्रिकेट हंगामालाही बसला. फ्लाईट्सच्या विलंबाने बीसीसीआयचे संपूर्ण वेळापत्रकाचे गणित बिघडवले.

इंडिगोमुळे पंचांना उशीर, खेळाडूंचा बसने प्रवास

इंडिगोच्या या संकटामुळे कूच बिहार ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या सामन्यांवर थेट परिणाम होत आहे. 8 डिसेंबर रोजी कल्याणी येथील बंगाल क्रिकेट अकादमीमध्ये बंगाल आणि गोवा (Goa) यांच्यात कूच बिहार ट्रॉफीचा सामना सुरु झाला. परंतु, कोलकाताला येणाऱ्या विमानाला उशीर झाल्यामुळे ऑन-फिल्ड पंच नितीन पंडित हे सामन्याचे पहिले सत्र सुरु झाल्यावरही पोहोचू शकले नाहीत. नितीन पंडित रस्ते मार्गाने कल्याणीला पोहोचेपर्यंत पहिल्या दिवसाचा लंचपर्यंतचा वेळ झाला होता. तोपर्यंत स्थानिक पंच प्रकाश कुमार यांनी सुरुवातीच्या सत्राची जबाबदारी सांभाळली.

IndiGo Flight
IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

केवळ पंचांनाच नाही, तर बंगालच्या संघालाही या समस्येचा फटका बसला. इंडिगोचे विमान रद्द झाल्यामुळे बंगालचा संघ कल्याणी येथे 30 तास बसचा प्रवास करुन सामन्याच्या काही तास आधी पोहोचला होता. दोन्ही संघांना अडचणींचा सामना करावा लागला असला तरी, त्यांनी वेळेवर सामना सुरु करण्यासाठी तयारी दर्शवली. मात्र, पंच नितीन पंडित यांच्या विमानाच्या विलंबाच्या कारणामुळे सामनाधिकारी व्ही. नारायणन कुट्टी आणि इतर अधिकाऱ्यांना पुष्टीकरणासाठी वाट पाहावी लागली.

बीसीसीआय अधिकाऱ्यांचे मत

इंडिगोच्या (Indigo) संकटामुळे देशांतर्गत हंगामातील महत्त्वाच्या सामन्यांवर परिणाम होत असताना, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने यावर आपले मत व्यक्त केले. अधिकाऱ्याने सांगितले की, "सध्या प्रवासात अडचणी येत आहेत. परिस्थिती हळूहळू सुधारत आहे, पण अद्याप पूर्णपणे सुधारणा झालेली नाही, त्यामुळे समस्या कायम आहेत. वेळापत्रकात बदल न करता टूर्नामेंट नियोजित वेळेनुसार व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."

IndiGo Flight
Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

कूच बिहार ट्रॉफीच्या वेळापत्रकात बदल

इंडिगो संकटामुळे काही सामन्यांचे वेळापत्रक बदलावे लागले आहे, ज्यामुळे बीसीसीआयचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. ओडिशा आणि कर्नाटक यांच्यात बलांगीर येथे 8 डिसेंबर रोजी सुरु होणारा कूच बिहार ट्रॉफीचा सामना 9 डिसेंबर पर्यंत एक दिवस पुढे ढकलण्यात आला. दोन्ही संघांच्या विमानांच्या वेळेत बदल झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यावरुन हे स्पष्ट होते की, इंडिगोच्या या संकटाचा थेट परिणाम केवळ सर्वसामान्य प्रवाशांवरच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या खेळ स्पर्धांवरही झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com