IND vs ENG: लीड्समध्ये 5 शतके गेली वाया! टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, इंग्लंडने 371 धावांचा पाठलाग करुन रचला इतिहास

IND vs ENG, 1st Test: लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
ani
englandDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs ENG, 1st Test: लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी करुन पहिल्या आणि दुसऱ्या डावात एकूण 5 शतके झळकावली, परंतु तरीही टीम इंडिया अपयशी ठरली. इंग्लंडने चौथ्या डावात 371 धावांचे मोठे लक्ष्य गाठून कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. शेवटच्या दिवशी 352 धावा करुन इंग्लंडने विजय मिळवला. शेवटच्या दिवशी कसोटी जिंकण्यासाठी यापेक्षा जास्त धावा फक्त एकाच संघाने केल्या होत्या. डॉन ब्रॅडमनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 1948 मध्ये हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध शेवटच्या दिवशी 404 धावा करुन ही किमया साधली होती.

कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी सर्वाधिक धावा करणारे संघ

404 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लीड्स, 1948

350 - इंग्लंड विरुद्ध भारत, लीड्स, 2025

344 - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, 1984

325 - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, 2021

ani
IND Vs ENG: बेन डकेटचा जलवा! कसोटी कारकिर्दीतील ठोकले सहावे शतक, जॅक क्रॉलीसोबत मोडला 76 वर्षे जुना विश्वविक्रम

5 शतके ठोकूनही पराभव

पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल, कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी उत्कृष्ट शतके झळकावली. जयस्वालने 101, गिलने 147 आणि पंतने 134 धावा केल्या. दुसऱ्या डावात केएल राहुल (137) आणि ऋषभ पंत (118) यांनीही चांगली कामगिरी केली. पहिल्यांदाच भारताने एका कसोटी सामन्यात 5 शतके झळकावूनही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जिथे 5 शतके असूनही एखाद्या संघाला कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने सामन्यात दोन्ही डावात मोठी आघाडी घेऊन इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु इंग्लंडच्या फलंदाजीला भारतीय गोलंदाज रोखू शकले नाहीत.

इंग्लंडने 5 विकेट्स शिल्लक असताना 371 धावांचे लक्ष्य गाठले, जे भारताविरुद्धच्या चौथ्या डावात कसोटी इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात यशस्वी धावांचे आव्हान आहे. 2022 च्या सुरुवातीला इंग्लंडने बर्मिंगहॅममध्ये 378 धावांचे लक्ष्य गाठले होते, परंतु यावेळी लीड्समध्ये 371 धावांचा पाठलाग करणे देखील ऐतिहासिक होते.

ani
IND Vs ENG: हॅरी ब्रूकच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, 148 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!

भारतीय गोलंदाज फेल ठरले

लीड्स कसोटीत, जसप्रीत बुमराह वगळता टीम इंडियाच्या उर्वरित गोलंदाजांनी खूप निराशा केली. प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे इंग्लिश फलंदाजांवर दबाव टाकण्यात अपयशी ठरले. बुमराहने पहिल्या डावात इंग्लंडच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, परंतु दुसऱ्या डावात 19 षटके टाकूनही त्याला विकेट घेता आली नाही. दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले, परंतु इंग्लंडला विजय नोंदवण्यापासून रोखू शकले नाहीत.

ani
IND vs ENG: KL राहुल शानदार! मुलतानच्या 'सुलतान'च्या रेकॉर्डशी केली बरोबरी

बेन डकेट विजयाचा नायक ठरला

इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने दुसऱ्या डावात ऐतिहासिक खेळी केली. त्याने 149 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान, डकेटला यशस्वी जयस्वालने 97 धावांवर जीवदान दिले, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. डकेट भारताविरुद्ध कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने जो रुटचा 142 धावांचा विक्रम मोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com