
Ben Duckett Test Century: पहिल्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी मंगळवारी (24 जून) पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाज फेल ठरले. विजयासाठी 371 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉली जोडीने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. इंग्लंडचा स्टार सलामीवीर बेन डकेटने शानदार शतक ठोकले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील सहावे आणि भारताविरुद्धचे दुसरे शतक आहे. दरम्यान, त्याने त्याचा सहकारी सलामीवीर जॅक क्रॉलीसोबत पहिल्या विकेटसाठी 150+ धावांची भागीदारी देखील केली.
दरम्यान, 371धावांचे आव्हानात्मक लक्ष्य गाठताना डकेटने चांगली फलंदाजी केली. सुरुवातीला त्याने भारताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध सावधगिरीने फलंदाजी केली आणि क्रीजवर स्थिरावल्यानंतर आकर्षक शॉट्स मारले. सामन्याच्या शेवटच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात त्याने आपले शतक पूर्ण केले. या डावात त्याला जीवनदानही मिळाले. यशस्वी जयस्वालने त्याचा झेल सोडला. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 62 धावा केल्या होत्या.
डकेटने 2016 मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. आतापर्यंत, त्याने 34 सामन्यांच्या 63 डावांमध्ये 41.09 च्या सरासरीने 2500 हून अधिक धावा केल्या. यादरम्यान त्याने 14 अर्धशतकांसह 6 शतके झळकावली. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 182 धावा आहे. त्याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 11,000 हून अधिक धावा केल्या आहेत.
डकेटने आतापर्यंत भारताविरुद्ध (India) 8 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 15 डावांमध्ये 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये दुसरे शतक ठोकले तसेच त्याने भारताविरुद्ध 1 अर्धशतकही झळकावले आहे.
दुसरीकडे, या सामन्यापूर्वी या मैदानावर कसोटीच्या चौथ्या डावात फक्त तीन वेळा सलामी जोडीने 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती, परंतु या सामन्यात जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी 100 धावांची भागीदारीच केली नाहीतर एक विश्वविक्रमही रचला. 1949 मध्ये, न्यूझीलंडच्या व्हर्डन स्कॉट आणि बर्ट सटक्लिफ यांनी मिळून सामन्याच्या चौथ्या डावात पहिल्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली होती. तेव्हापासून कोणीही त्यांचा हा विक्रम मोडू शकला नव्हता, परंतु आता या जोडीने आता त्यांचा हा विक्रम मोडला.
तसेच, 1982 मध्ये वेस्ट इंडिजचे गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स यांनी एकाच मैदानावर चौथ्या डावात पहिल्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली होती. याआधी 1982 मध्ये, इंग्लंडचे ग्रॅमी फाउलर आणि ख्रिस टवेरा यांनी मिळून चौथ्या डावात पहिल्या विकेटसाठी 103 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर आता इंग्लंडचे (England) दोन्ही सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी केवळ 100 धावाच केल्या नाहीतर सर्वोच्च भागीदारीचा विक्रमही केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.