Manish Jadhav
क्रिकेटमध्ये नशीब खूप महत्वाचे असते, अन्यथा फलंदाज चांगला खेळूनही शतक हुकतो. लीड्स कसोटीत इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रूकसोबतही असेच काहीसे घडले.
इंग्लंडच्या पहिल्या डावात हॅरी ब्रूकने फलंदाजीने शानदार कामगिरी केली आणि भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याला शानदार शतक झळकावण्याची उत्तम संधी होती, परंतु त्याच्या नशिबाने त्याला दगा दिला.
ब्रूकने त्याचे शतक फक्त एका धावेने हुकले. प्रसिद्ध कृष्णाने त्याला 99 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने त्याच्या डावात 112 चेंडूंचा सामना करुन 11 चौकार आणि 2 षटकार मारले.
बराच वेळ क्रीजवर राहूनही तो त्याचे शतक पूर्ण करु शकला नाही, ज्याची खंत पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.
पहिल्या डावात शतक हुकल्यानंतर इंग्लिश चाहत्यांना हॅरी ब्रूककडून खूप अपेक्षा होत्या, परंतु तो खातेही उघडू शकला नाही.
55व्या षटकात 149 धावांवर सलामीवीर बेन डकेट पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर नवीन फलंदाज म्हणून मैदानात आलेला हॅरी ब्रूक त्याच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरचा बळी ठरला.
अशाप्रकारे, हॅरी ब्रूकच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला, जो आजपर्यंत कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात कोणीही केला नव्हता.
ब्रूक हा कसोटी सामन्यात 99 धावांवर बाद होणारा आणि शून्य धावांवर बाद होणारा जगातील 5वा खेळाडू बनला आहे.