IFL 2026: धेंपो क्लबसमोर आणखी एक कठीण आव्हान, शिलाँग लाजाँगविरुद्ध फातोर्डा येथे लढत

IFL 2026 Dempo vs Shillong Lajong: इंडियन फुटबॉल लीगमध्ये (आयएफएल) सहा सामने खेळल्यानंतरही विजयाविना असलेल्या धेंपो स्पोर्टस क्लबसमोर मंगळवारी (ता. ७) आणखी एक कठीण आव्हान असेल.
IFL 2026
IFL 2026 Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंडियन फुटबॉल लीगमध्ये (आयएफएल) सहा सामने खेळल्यानंतरही विजयाविना असलेल्या धेंपो स्पोर्टस क्लबसमोर मंगळवारी (ता. ७) आणखी एक कठीण आव्हान असेल. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांचा सामना शिलाँग लाजाँग एफसीविरुद्ध होईल.

मागील लढतीत फातोर्डा येथेच नामधारी इलेव्हनला १-१ असे गोलबरोबरीत रोखलेल्या धेंपो क्लबचे सहा सामन्यांतून फक्त तीन गुण असून ते दहा संघांच्या स्पर्धेत नवव्या क्रमांकावर आहेत. शिलाँग लाजाँगने सहापैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यांच्या खाती ११ गुण जमा झाले आहेत. मागील लढतीत त्यांना हैदराबाद येथे श्रीनिदी डेक्कनविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.

धेंपो क्लबने सहा लढतीतून तब्बल १२ गोल स्वीकारले आहे. बचावफळीतील कमजोरी त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरली आहे. मागील लढतीत नामधारी संघाविरुद्ध धेंपो क्लबने वर्चस्व राखले, परंतु सदोष नेमबाजी व प्रतिस्पर्धी गोलरक्षकाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना विजय शक्य झाला नाही.

IFL 2026
Goa Accident: दोनापावल-बांबोळी मार्गावर आलिशान भरधाव कारचा कहर; ठोकर दिल्याने तरुणी ठार, युवक गंभीर

एका विजयाची गरज - समीर नाईक

धेंपो क्लबचे मुख्य प्रशिक्षक समीर नाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की ‘‘आमच्या ड्रेसिंग रूममध्ये खूप सकारात्मक वातावरण आहे. ही स्पर्धा अत्यंत अनिश्चित आहे आणि गोष्टी खूप वेगाने बदलू शकतात. एक विजय आम्हाला चांगल्या स्थितीत आणू शकतो. संघात कोणतीही दुखापत नाही. दोन खेळाडूंच्या किरकोळ दुखापती होत्या, पण ते आता पूर्णपणे सावरले असून आज सरावही केला. आमच्याकडे पूर्ण संघ उपलब्ध आहे. या क्षणी खेळाडूंना चाहत्यांचा पाठिंबा खूप गरजेचा आहे.”

IFL 2026
Goa Crime: डिचोलीतील 'सेतू संगम'च्या सुरक्षेत त्रुटी, संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ

संधीचा लाभ घ्यावाच लागेल - अमेय

धेंपो क्लबचा बचावात्मक-मध्यरक्षक अमेय मोरजकर याने मागील लढतीत संधी असून विजय हुकल्याची खंत व्यक्त केली, त्याचवेळी सकारात्मक निकालासाठी आपला संघ पूर्ण तयारीत असल्याचेही नमूद केले. शिलाँग लाजाँगविरुद्धच्या लढतीविषयी तो म्हणाला, की ‘‘आम्हाला संधींचा लाभ उठवावा लागेल, तसेच खेळावर नियंत्रण ठेवावे लागेल.” शिलाँग लाजाँग हा मजबूत संघ असला, तरी त्यांच्यासाठी सामना सोपा नसेल, आपला संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल हा विश्वास अमेयने व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com